१४ वर्षीय युवतीवर झालेल्या अमानुष अत्याचारा विरोधात "अभाविप" चे जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र निदर्शने


१४ वर्षीय युवतीवर झालेल्या अमानुष अत्याचारा विरोधात "अभाविप" चे जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र निदर्शने

सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर असलेल्या ऐतिहासिक पुणे शहराला काळीमा फासणारी घटना दि. ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर या कालावधीत घडली. 

पुणे शहरात एका १४ वर्षीय चिमुरडीवर एकूण १३ नराधमांनी सलग २ दिवस पाशवी बलात्कार केल्याच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. मित्राला भेटण्यासाठी घरातून निघून आलेल्या मुलीचे मदतीच्या बहाण्याने रिक्षाचालकाने अपहरण केले, त्यानंतर तिच्या वर सामूहिक अत्याचार केले ही अत्यंत गंभीर व घृणास्पद घटना आहे. या संपूर्ण घटनेचे गांभिर्य लक्षात घेता राज्यात महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.


या क्रूर घटनेच्या अनुषंगाने आज दिनांक ९ सप्टेंबर रोजी अभाविप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र स्वरूपाचे निदर्शन केले व युवती ला न्याय मिळावा या साठी तीव्रतेने मागणी केली तसेच राज्य सरकार च्या विरोधात घोषणाबाजी केली, राज्य सरकारच्या मंत्री मंडळात असलेल्या मंत्र्यांवर जे महिला अत्याचारांचे आरोप झाले आहे त्यावर देखील कारवाई व्हावी यासाठी रोष व्यक्त करण्यात आला. 


 राज्यात वारंवार महिलांवर अत्याचार होणाऱ्या घटना घडत आहेत, मुख्यमंत्र्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः विशेष लक्ष घालून महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने कठोर पावले उचलावीत व हा खटला जलद न्यायालयात (Fast Track Court) चालविण्यात यावा व दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा अभाविप या पेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल  अशी मागणी अभाविप पुणे महानगर मंत्री शुभम भुतकर यांनी केली व आंदोलनाचा इशारा दिला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News