साई समर्थ प्रतिष्ठाण निवारा,श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल कोपरगांव यांच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन


साई समर्थ प्रतिष्ठाण निवारा,श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल कोपरगांव यांच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन

कोपरगाव प्रतिनिधी / राजेंद्र तासकर

साई समर्थ प्रतिष्ठाण निवारा, श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल कोपरगाव यांच्या वतीने सर्व रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

       कोपरगाव येथे साई समर्थ प्रतिष्ठाण निवारा शाखा क्रं ३ ,  श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल कोपरगांव यांच्या वतीने  मोफत सर्व रोग निदान शिबीर आयोजित केले असुन शिबीराच्या ठिकाणी अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन, सल्ला व आवश्यकता असल्यास मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. रविवार दिनांक १२/९/२०२१ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत शिबिर असणार आहे. तरी सदर शिबिराचा गरजुंनी मोठया संख्येने अवश्य लाभ घ्यावा,असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख कलविंदर सिंग दडियाल यांनी केले आहे.

            या शिबिराचे उदघाटन  मा.नगराध्यक्ष,शिवसेना उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच या शिबिरासाठी प्रमुख मान्यवर म्हणुन योगेश चंद्रे साहेब तहसिलदार कोपरगांव, डॉ. कृष्णा फुलसौंदर आरोग्य अधिकारी ग्रामिण रुग्णालय कोपरगाव,वासुदेव देसले पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन कोपरगांव,डॉ.जिया शेख BAMS आयुर्वेद,राजेंद्र सालकर अध्यक्ष प्रेस क्लब कोपरगांव, बाळासाहेब आव्हाड अध्यक्ष दैत्यगुरू शुक्राचार्य मंदिर ,दिनार पद्मकांत कुदळे उद्योजक,भरत मोरे शहराध्यक्ष एस.टी.कामगार सेना,अस्लम शेख विधानसभा संघटक,डॉ.नरेंद्र भट्टड श्री.जी कम्युटरराईज ब्लड लॅब, इरफान शेख शिवसेना जिल्हाप्रमुख वाहतुक उत्तर नगर यांची उपस्थिती असणार आहे.या शिबिरामध्ये तपासणी करुन आवश्कता असल्यास महात्मा फुले,जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रीया देखील केली जाणार आहे.मेंदूच्या,हाडांच्या, दातांच्या, हदय विकाराच्या, डोळ्यांच्या, युरोच्या अशा अनेक  रोगांचे निदान करुन आवश्यकता असल्यास शस्त्रक्रीयेसाठी डाॅ.अमित नाइकवाडे अस्थिरोग तज्ञ ,डाॅ.शंशाक तुसे MBBS. MD, डाॅ.निरज काळे MBBS. Ms हदय शस्त्रक्रीया तज्ञ, डाॅ.सौ.तेजश्री चव्हाण (नाईकवाडे)नेत्ररोग तज्ञ,डाॅ.विशाल काळे अस्थिरोग तज्ञ,डाॅ.पूजा कातकडे,डाॅ.तुषार सांळुके,डाॅ.प्रशांत सगळगीळे,डाॅ मयूर गंगवाल ह्या तज्ञ डाँक्टरांच्या उपस्थितीत केली जाणार आहे.

शिबिराचे ठिकाण : दादाप्पा खंडोप्पा कोयटे शाळा, निवारा हौ.सोसायटी कोपरगाव या ठिकाणी शिबीर आयोजित केलेले असुन, कोपरगाव तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News