शिरूर येथे माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना स्मुर्ती दिनानिमित्त विनम्र अभिवादन


शिरूर येथे माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना स्मुर्ती दिनानिमित्त विनम्र अभिवादन

माँसाहेब मीनाताई ठाकरे व शिवसेना हे ध्येय धोरण या विषयी मनोगत पोपटराव ढवळे यांनी व्यक्त केले.

शिरूर | प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे )

                शिरूर शहर या ठिकाणी माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना स्मुर्ती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या विषयी बोलताना शिवसेना व शिवसेनिक यांच्या बदल असलेली एक जीवाळ्याची आपुलकी त्यांचं ध्येय धोरण या विषयी मनोगत शिवसेनेचे शहर विभाग प्रमुख पोपटराव ढवळे यांनी व्यक्त केले.

         शिरूर शहर येथील "परी कलेक्शन" येथे माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना स्मुर्ती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.सध्याच्या काळात वाढत्या करोनाच्या संसर्गचा इतका प्रार्दूभाव वाढला असल्यामुळे सोशल डिस्टन्स (सुरक्षित अंतर )ठेवणं गरजेचं असलं तरीही आपण सर्वांनी आपली काळजी घेणं जरुरीचे असल्याचे याप्रसंगी शिवसेनेचे शहर युवा सेना अध्यक्ष सुनील जाधव यांनी अभिवादनास्पद भाषण करताना व्यक्त केले.

          याप्रसंगी शिवसेनेचे शहर विभाग प्रमुख पोपटराव ढवळे,शिवसेनेचे शहर युवा सेना अध्यक्ष सुनील जाधव, लाला लोखंडे,सुनील जठार, स्वप्नील रेड्डी,आदिसह अनेक शिवसैनिक व नागरिकांनी सोशल डिस्टन्स (सुरक्षित अंतर )ठेवा अन धोका टाळा या गोष्टीचं अवलंब करत सर्वच मोठया संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News