आईवडिलांना वृद्धपकाळात दूर लोटू नका, त्यांचा आधार बना -- वर्षाताई वाघमारे


आईवडिलांना वृद्धपकाळात दूर लोटू नका, त्यांचा आधार बना -- वर्षाताई वाघमारे

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : आपल्या वृद्ध आईवडिलांना त्यांच्या वृद्धपकाळात त्यांना दूर लोटू नका  त्यांचा आधार बना वृद्धाश्रम उघडण्याची गरज पडणार नाही असे मत वर्षा फाउंडेशनच्या संस्थापिका वर्षाताई वाघमारे यांनी व्यक्त केले आहे, आमच्या प्रतिनिधींशी बोलताना वर्षाताई म्हणाल्या आपल्या जन्माचे स्वागत आपल्या आईवडिलांनी धुमधडाक्यात केले आहेत, माझ्या घरी लक्ष्मी जन्माला आली, माझ्या घरी आमच्या घराण्याचा वारस आला,म्हातारं पणाचा आधार जन्माला आला असे म्हणून ते आनंद साजरा करतात, तुम्ही जसजसे मोठे होत जातात तसे तुमचे लाड पुरवले जातात आणि त्यांच्या उतार वयात त्यांना तुमच्या आधाराची गरज असताना तुम्ही निराधार करून मरणयातना भोगण्यासाठी सोडून देतात, अशा निराधार लोकांसाठी थेऊर येथील उत्तम वृद्धाश्रम सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले, निराश्रित लोकांना आम्ही आधार देतो रस्त्याच्या कडेला आजाराने त्रस्त झालेल्या वृद्धांना दयाळू पोलीस सरकारी दवाखान्यात आणून सोडतात अशा लोकांना आम्ही आमच्याकडे घेऊन येतो, भीक मागून जगणारे,ज्यांना कोणीच नाही अशा निराधार लोकांना आमच्याकडे आधार दिला जातो, त्यांच्या राहण्याची खाण्याची आणि औषधांची सोय केली की झाले,त्यांना या वयात जास्त काही लागत नाही हो प्रेमाचे आणि मायेचे दोन शब्द आणि आपुलकीची वागणूक दिली की ते सुखाने राहतात,4 एप्रिल रोजी जगण्याची इच्छा जवळजवळ सोडूनच दिलेल्या वृद्ध व्यक्ती आम्ही घेऊन आलो,तेथील डॉक्टरानी सांगितले की ही व्यक्ती कित्येक दिवस झाले काहीच खात नाही, काही खाल्ले तर त्यांची संडास लघवी जागेवर च होते त्यामुळे ते काहीच खात नाहीत, त्या व्यक्तीला येथे आणल्यानंतर त्यांना व्यवस्थित वागणूक देऊन समजून सांगितले, आता ते बागेत फिरतात,सर्व गोष्टी स्वतः करतात, वर्षाताईंनी आमच्या माध्यमातून जनतेला आवाहन केले आहे की तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत याची जाणीव ठेवून त्यांना आधार द्या,त्यांच्या या सामाजिक कार्यात गुरुप्रमाणे मार्गदर्शन करणारे प्रेरणास्थान सुधीरजी बुक्के,नवनाथजी जगताप, डॉ किरण सुरवसे, डॉ चव्हाण, ग्रामपंचायत सरपंच अप्पासाहेब काळे, विठ्ठलनाना काळे आणि सर्व संचालक मंडळ यांच्या सहकार्याने आणि प्रेणेने कार्य अविरत सुरु राहील असे आश्वासन दिले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News