लोणी भापकर येथे उमाजी नाईक यांना अभिवादन


लोणी भापकर येथे उमाजी नाईक यांना अभिवादन

बारामती : प्रतिनिधी  (काशिनाथ पिंगळे) आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या २३० व्या जयंतीनिमित्त लोणीभापकर मधील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच रवींद्र भापकर यांच्या हस्ते उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

      कोरोनामुळे शासकीय नियमानुसार जास्त गर्दी न करता साध्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मदने यांनी आपले विचार मांडले.

       या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य पद्मनाथ कडाळे, बांधकाम कामगार सेनेचे बारामती तालुकाध्यक्ष अविनाश बनसोडे, आबा ठोंबरे, विजय पाटोळे, अमोल मदने, कांतीलाल मदने, अनिल भापकर, ग्रामविकास अधिकारी रामराव चांदगुडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News