रेल्वे माथाडी कामगार युनियनचा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.


रेल्वे माथाडी कामगार युनियनचा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.

अहमदनगर रेल्वे मालधक्का वरील हुंडेकरी व वाहतूक संघटनेच्या आडमुठ्या धोरणामुळे बंद असलेले काम चालू करण्याची माथाडी कामगारांची मागणी.                                                                                                                  अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत )- अहमदनगर रेल्वे मालधक्या वरील हुंडेकरी व वाहतूक संघटनेच्या आडमुठेपणामुळे बंद झालेले काम चालू होण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर रेल्वे माथाडी कामगार युनियन च्या वतीने मोर्चा काढण्यात आला व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी नगरसेवक प्रशांत गायकवाड, अविनाश घुले, भैहिरनाथ वाकळे, महबूब सय्यद, गणेश केदार, मधुकर पाटोळे, संजय पाडळे, दीपक रोकडे, रोहिदास भालेराव, गणेश जाधव, सुरेश निर्भवणे, पंडित झेंडे, भगवान झेंडे, बळीराम झेंडे, संभाजी कोतकर, पोपट लोंढे, विलास उबाळे, सागर पोळ, शरद वाकचौरे, वसंत पेटारे आदीसह माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.                               

अहमदनगर रेल्वे वरील लोडींग अनलोडींग चे काम 4 ऑगस्ट 2021 पासून हुंडेकरी व वाहतूक ठेकेदार यांनी माल येथें न  बोलावल्यामुळे बंद आहे अहमदनगर रेल्वे मालधक्क्यावर माथाडी मंडळातील सुमारे 600 नोंदणीकृत कामगार काम करत आहेत हुंडेकरी व वाहतूक ठेकेदार आणि कामगार यांच्यामध्ये दर 3 वर्षासाठी करार होत असतो पण गेल्या वर्षीच्या कोणाच्या अपवादात्मक परिस्थिती मुळे केवळ 1 वर्षाचेच करार करण्यात आला होता 31 मार्च 2021 रोजी हा करार संपुष्टात आल्यानंतर कामगार आणि हुंडेकरी व वाहतूक ठेकेदार संघटना यांच्यामध्ये वेळोवेळी बैठका झाल्या त्यामध्येही उपरोक्त प्रश्न सुटला नाही म्हणून सहाय्यक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष आणि कामगार मंडळ अहमदनगर यांनी इतर जिल्ह्यातील रेल्वे मालधक्का वरील प्रचलित दराचा सांगोपांग विचार करून कामकाज सुरळीत होण्यासाठी 28 जुलै 2021 रोजी मजुरी व वाराईचे दर निश्‍चित करून काम सुरू करण्याचे आदेश दिले माथाडी कामगारांनी प्रस्तुत आदेश मान्य असल्याचे आणि काम करण्यास तयार असल्याचे लेखी स्वरूपात कळवले आहे पण हुंडेकरी व वाहतूक ठेकेदार यांनी आडमुठेपणाची भूमिका घेऊन अहमदनगर रेल्वे मालधक्क्यावर येणारा माल जाणीवपूर्वक इतरत्र स्थलांतरीत केला या संदर्भात सहाय्यक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष माथाडी कामगार मंडळ अहमदनगर यांनी वारंवार आदेश देऊनही हुंडेकरी व वाहतूक ठेकेदार हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहे माथाडी कामगार काम करायला तयार असतानाही सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या आदेश असतानाही हुंडेकरी व वाहतूक ठेकेदार आडमुठेपणाची धोरण घेत आहेर अहमदनगर रेल्वे मालधक्क्यावर माल आणायच्या ऐवजी इतरत्र उतरवला जात आहे. कोरोना आपत्ती काळात माथाडी कामगारांची उपासमार करण्यासाठी तो माल उतरविण्यात येत आहे त्यांच्या या चुकीच्या धोरणाचा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांची चुक आहे त्यांच्या या चुकीच्या धोरणामुळे सहाशे हमाल माथाडी कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले त्यांचे कुटुंबीय असे एकूण 3 ते 4 हजार माणसांचा कोरोना आपत्ती काळात प्रश्न निर्माण झालेला आहे त्यांनी केलेल्या या सहाशे माणसांच्या बेरोजगारीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे कामगार आयुक्त तथा अध्यक्ष माथाडी कामगार मंडळ अहमदनगर यांनी 28 जुलै रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी तसेच सहाय्यक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष माथाडी कामगार मंडळ अहमदनगर यांनी दिलेल्या आदेशाची हुंडेकरी व वाहतूक ठेकेदार अंमलबजावणी करीत नसतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी तसेच 3 आणि 4 ऑगस्ट पासून काम बंद आहे आम्ही काम करण्यास तयार असताना ही केवळ हुंडेकरी व वाहतूक ठेकेदार यांच्यामुळे काम बंद आहे त्यामुळे आमची आर्थिक नुकसान होत आहे तरी काम बंद असण्याच्या कालावधीत 75 टक्के मजुरी मिळावी व कृषि विकास अधिकारी जिल्‍हा परिषद अहमदनगर यांनी माथाडी कामगार संपावर आहेत अशी चुकीची माहिती देऊन खत उत्पादक कंपन्या आणि प्रशासनाची दिशाभूल केली आहे त्यांच्यावर शासकीय सेवा शर्ती कायद्यानुसार कर्तव्यात कसूर आणि शासनाची दिशाभूल केली म्हणून प्रशासकीय कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News