पोलीस उपविभागीय कार्यालयात भरोसा सेलचे कामकाज सुरू करावे- अँड.नितीन पोळ


पोलीस उपविभागीय कार्यालयात भरोसा सेलचे कामकाज सुरू करावे- अँड.नितीन पोळ

कोपरगाव प्रतिनिधी /रार्जेद्र तासकर

महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी  जिल्ह्याच्या ठिकाणी "भरोसा सेल" सुरू करण्यात आले आहे मात्र जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक तक्रारदार महिला व पुरुषांना जाणे शक्य नसते त्यामुळे सदर भरोसा सेलच्या शाखा  उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात व्हावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे

आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की      

    महिलांवर होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाच्या तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या नंतर  आता तातडीने गुन्हा दाखल न करता सदर तक्रारी  तडजोड करण्यासाठी नगर येथील भरोसा सेल कडे पाठवल्या जातात    

  नगर येथील कार्यालयात प्रत्येक महिलेला प्रत्येक तारखेस जाणे शक्य होत नाहीत तसेच तक्रार दाखल केल्या नंतर तिच्या कुटुंबातील व सासर कडील लोकांना तक्रारीची शहानिशा करण्यासाठी, आपली बाजू मांडण्यासाठी नगर कार्यालयात किमान तीन चार वेळा बोलावले जाते एखादया महिलेला जिल्ह्याच्या ठिकाणी जाताना सोबत आई वडील भाऊ यांना सोबत घेऊन जावे लागते त्याच सोबत छोटी मुले असतील तर अधिकच ओढाताण होते, जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन देखील दोन्ही बाजूकडील लोक वेळेत हजर असणे आवश्यक असते त्याच प्रमाणे एका वेळी दोन्ही बाजूचे लोक हजर नसतील तर पुढील तारीख दिली जाते  अशा प्रकारे  नगर येथील कार्यालयात चार दोन चकरा मारून प्रकरणात  तडजोड न झाल्यास संबंधित महिला तक्रारदारास स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र दिले जाते ते पत्र  आणण्यासाठी पुन्हा एक चक्कर मारावी लागते अशा प्रकारे जिल्ह्याच्या ठिकाणी साधारण शंभर किलो मीटर चक्कर मारून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो त्यातच बऱ्याच महिला कौटुंबिक वाद सुरू असताना तिला कोणताही कामधंदा नसतो त्यामुळे नाविलाजने तिला आई वडील भाऊ यांच्या वर अवलंबून राहावे लागते कौटुंबिक वाद त्यात आर्थिक परिस्थिती हलाखीची आणि त्यातून त्या सोडविण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागते 

अशा सर्व गोष्टींचा विचार करून सदर भरोसा सेल कार्यालयाचे उप शाखा पोलीस उपविभागीय कार्यालय येथे सुरू करावे त्यामुळे एक किंवा दोन तालुके मिळून असलेल्या पोलीस विभागीय कार्यालयात शाखा सुरू केल्यास महिलांना होणारा त्रास कमी होईल व झटपट न्याय मिळेल शासन एका बाजूला महिला व बालकांच्या सक्षमीकरण प्रयत्न करत असून दुसरी कडे न्याय मिळवण्यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे असे या पत्रकात म्हटले आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News