झेंडीगेट हनुमान मंदिरात पोथी समाप्ती.. "राम" : आजच्या पिढीसाठी आदर्श .. श्रीराम कथेतून हेच संबोधित होते


झेंडीगेट हनुमान मंदिरात पोथी समाप्ती..  "राम" : आजच्या पिढीसाठी आदर्श .. श्रीराम कथेतून हेच संबोधित होते

 अहमदनगर( प्रतिनिधी संजय सावंत :) भगवान राम हे आजच्या पिढीसाठी एक आदर्श आहे कारण त्यांचे आचरण,विचार आणि उच्चार हे तत्कालीन समाजाला सुखावणारे होते.तसेच त्यांच्या कथेतून हे संबोधित होते.ग्रंथ पारायण केल्याने आणि त्याचे श्रवण करण्याने आपल्याला जीवनात कसे जगायचे,शांती समाधान प्रत्येकाला फारसे मूल्य खर्च न करता कसे प्राप्त करायचे हे त्यातून सांगितले जाते.मात्र,अनेकजण सुखी जीवन सोडून अशांती कडे वाटचाल करून सुख हरवतात.त्यांना रामा सारख्या अनेक थोर विभूतींच्या जीवन चरित्राची ओळख करून देण्यासाठी असे पारायण, प्रबोधन, व्याख्याने असतात.असे उपक्रम विशिष्ट धर्म किंवा अध्यात्म म्हणून न पाहता अखिल मानव जातीला मार्गदर्शन यातून आहे हे समजून घेतले तर समानतेचा खरा अर्थ समजावून  घेता येईल  व तसे आचरण प्रत्येकजण करेल असे यावेळी कथा प्रवचनाचा समारोप करतांना सांगण्यात आले.श्री.राहुल कावट व भक्तगणांनी  गत श्रावण मासात तुलसीदास विरचित- "श्री राम चरित मानस" या ग्रंथाचे सामुदायिक वाचन (पारायण) केले.हे पारायण श्रावणात दररोज सायंकाळी बंद मंदिरात पुजारी व मोजक्या भक्तगणात होत होते.त्या कथेची समाप्ती सोमवारी सायंकाळी करण्यात आली.यावेळी श्रीराम ग्रंथाची मंदिरात पाच प्रदक्षणा घालून दोन जणांनी मिरविले. मंगळवारी दुपारी मंदिरात भंडाराचे (महाप्रसादाचे) आयोजन केले होते.कोरोना प्रादुर्भावामुळे मोजक्या भक्तांनी सुरक्षित अंतर ठेवून या सोहळ्यात सहभाग घेतला,या निमित्ताने श्री सत्यनारायण महापूजा करण्यात आली.या सोहळ्यात भक्तगण रंगून गेले होते.रामनामात तल्लीन झाले होते.राम नाम गर्जनेने मंदिर दुमदुमले होते .पहिल्या श्रावणी सोमवारी सुरू झालेल्या ग्रंथ पारायणाची सांगता पाचव्या श्रावणी सोमवारी झाली हे यंदाचे वैशिष्ट्य होते. या मंदिराचे पुजारी रामदास कावट,दर सप्ताहात सुंदर कांडचे आयोजन करणारे अनिल झंवर,या उपक्रमात नियमित भाग घेणारे भक्तगण सौ उमा झंवर व श्री नंदकिशोर झंवर , राजगोपाल झंवर, सौ लढ्ढा भाभी यांचा सत्कार  करण्यात आला.भक्त सुरेश झंवर यांनी सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.  साईनाथ कावट, किसनलाल कावट, कैलास मोकाटे व सौ मोकाटे, दत्तात्रय आखमोडे, विजय इथापे, शिवनारायण वर्मा आदी यावेळी उपस्थित होते. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News