वरवंड येथील घरफोडीतील सराईत आरोपी जेरबंद : यवत पोलीस स्टेशनची वरवंड येथे कारवाई


वरवंड येथील घरफोडीतील सराईत आरोपी जेरबंद : यवत पोलीस स्टेशनची वरवंड येथे कारवाई

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी :

पाटस : गुरुवार (दि.२) पहाटे २.४५ वा. चे दरम्यान वरवंड ता.दौंड जि. पुणे गावचे हद्दीत फिर्यादी गणेश बाळासो काकडे (वय २९ वर्षे रा.गोपीनाथनगर, वरवंड ता.दौंड जि.पुणे) हे जेवण करून खोली मध्ये दोन्ही मोबाईल त्यांचे जवळ घेऊन झोपले होते. पहाटे ०२:४५ वाचे सुमारास फिर्यादी यांचे पत्नीला जाग आली त्यावेळी त्यांनी फिर्यादी यांना झोपेतून उठवून सांगितले की, आपले दरवाजा उघडा आहे. त्यावेळी घरातील सगळे लोक जागे होऊन बाहेर पाहिले असता कोणीही दिसून आले नाही. परंतु दोन्ही मोबाईल एक रिअलमी व दुसरा विवो कंपनीचा दिसून न आलेने फिर्यादी यांची खात्री झाली की, कोणीतरी अज्ञात चोरट्याने कडी खराब झालेल्या दरवाजा ढकलून घरामध्ये प्रवेश करून अंथरुणावर ठेवलेले दोन्ही मोबाईल चोरी केले आहेत. वगैरे मजकुरचे फिर्यादी वरून यवत पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ७५९/२०२१ भा.द.वि. ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

     सदर गुन्हा घरफोडीचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने उघडकीस आणणेबाबत पुणे जिल्हयाचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे यवत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले पथकाने तपास सुरु केला. घटनास्थळी भेट देवून गुन्हयाची माहिती काढून तपास करीत असताना प्राप्त झालेल्या माहिती नुसार सदरचा गुन्हा हा यापूर्वीचा रेकॉर्डवरील गुन्हेगार चंद्रकांत उर्फ चंदऱ्या जाधव यानेच केला असल्याची खात्री झाली. त्यावरुन आरोपी वरवंड गावचे हद्दीत महानंदा डेअरी समोर चोरीचे मोबाईल विकायला येणार असलेची माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस पथकास मिळालेने पोलीसांनी वेषांतर करून त्या ठिकाणी जाऊन आरोपी चंद्रकांत उर्फ चंदऱ्या  शिवाजी जाधव (वय ३० वर्षे, रा.वरवंड गोपीनाथनगर, ता.दौंड, जि.पुणे) यास सापळा रचून ताब्यात घेतले. 

      सदर आरोपीकडून घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला असून त्याचे कडून २१,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत अट्टल गुन्हेगार असून त्याचेवर यवत, दौंड, हडपसर या पोलीस ठाण्यात  खुन, जबरी चोरी, घरफोडी इत्यादी प्रकारचे एकूण ३ गुन्हे दाखल आहेत.

      सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामती अपर पोलिस अधिक्षक मिलींद मोहिते,  उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार, पो.स.इ. संजय नागरगोजे, पो.हवा. संजय देवकाते, पो.हवा संदीप कदम, पोहवा. निलेश कदम, पो.हवा. गुरू गायकवाड, पो.ना. अजिंक्य दौंडकर, पो.शि. सोमनाथ सुपेकर यांनी केलेली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News