बॅटल डान्स आणि स्केट डान्स खेळाचे एक दिवसीय कार्यशाळा संपन्न


बॅटल डान्स आणि स्केट डान्स खेळाचे एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

शहर व जिल्ह्यातील सर्व डान्सर साठी घेतल्या जाणार  विषेश स्पर्धा; धनंजय विष्णू जाधव

पुणे, ६ सप्टेंबर: डान्स स्केट स्पोर्ट्स असोसिएशन पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड तसेच बॅटल स्पोर्ट्स डान्स असोसिएशन पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड यांच्या वतीने बॅटल डान्स आणि स्केट डान्स या दोन्ही खेळाचे एक दिवसीय सेमिनार आज सोमवार रोजी मुकुंद नगर येथील कटारिया हायस्कूल येथे आयोजित केले होते. आजच्या या सेमिनार मध्ये बॅटल डान्स आणि स्केट डान्स या खेळाची सखोल माहिती, खेळाची प्रात्यक्षिक आणि संबंधित विषयावर चर्चासत्र असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. स्केट डान्स असोसिएशनचे पुणे शहर अध्यक्ष धनंजय विष्णू जाधव यांनी प्रास्ताविक केले. तर ऑल इंडिया फेडरेशनचे पदाधिकारी मार्क भस्मे सर यांनी या खेळा सबंधीचे नियम, खेळाचे प्रकार आणि खेळाची सर्व माहिती दिली, तांत्रिक माहिती बाबत मिलिंद क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले. सेमिनारसाठी राजन नायर, संजय कांबळे , संजय शेंडगे, जयंत देशपांडे, रवीन्द्र साठे, सुशांत शेट्टी, विशाल देसाई, धनंजय मदने, अविनाश शेंडगे, संजय ऐकले, विभाकर तेलोरे, सुजाता क्षीरसागर, शायनी म्हस्के, विजय तेपागुडे, यांच्या उपस्थितीसह पुणे जिल्हा, पुणे शहर, आणि पिंपरी चिंचवड मधून असोसिएशनचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.

बॅटल डान्स आणि स्केट डान्स खेळाच्या स्पर्धा सर्व शाळा, महाविद्यालय, विविध अकेडमी मधील डान्सर साठी घेतल्या जाणार असल्याची माहिती स्केट डान्स असोसिएशनचे पुणे शहर अध्यक्ष, भाजपा पुणे शहर प्रवक्ता आणि उपाध्यक्ष धनंजय विष्णू जाधव यांनी या प्रसंगी दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News