पांढरवस्ती शाळेत शिक्षक दिन साजरा


पांढरवस्ती शाळेत शिक्षक दिन साजरा

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे न्यू इंग्लिश स्कूल पांढरवस्ती, वाकी, चोपडज, कानडवाडी या विद्यालयांमध्ये शिक्षक दिन व शिक्षक गौरव सप्ताह (थँक्स अ टीचर) या शासनाच्या उपक्रमांतर्गत विद्यालयांमध्ये दि.२ सप्टेंबर २०२१ ते ७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत विद्यालयात ऑफलाईन व ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा, निबंध, चित्रकला, काव्यवाचन, स्वयमरचित काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.       शिक्षक दिनाचे औचित्य साधून संस्थेच्यावतीने विद्यालयाचे मुख्याध्यापक इनामदारसर यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे गुलाबपुष्प व श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित केले.     

 याप्रसंगी विद्यालयांमध्ये सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक महाराष्ट्र पोलीस वृत्तवार्ता प्रबोधिनी पुण्याचे सुरेश गायकवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी त्यांनी वृक्षारोपणासाठी दहा हजार रुपये विद्यालयास भेट दिले. ह.भ.प आकाश महाराज जगताप यांनी विद्यालयातील ऑफिससाठी फर्निचरच्या कामाकरिता २५ हजार रुपयांची देणगी भेट दिली.     

याप्रसंगी ग्रामपंचायत चोपडज व ग्रामस्थांच्या वतीने विद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून देण्याचे घोषित केले. रामचंद्र टकले यांनी घड्याळ व ट्यूबलाइट भेट दिली. 

  याप्रसंगी सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगरचे माजी प्राचार्य एस.एस. गायकवाड, प्रा. बाळासाहेब जगताप, आकाश महाराज जगताप यांनी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.

      याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांच्या मार्गदर्शननुसार मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.जी. शेंडकर व आर.एम. कुतवळ यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक इनामदारसर यांनी केले तर आभार भापकर सर यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News