सावलीविहिर येथे बेल पोळा आनंदात साजरा


सावलीविहिर येथे बेल पोळा आनंदात साजरा

शिर्डी, राजेंद्र दूनबळे, राहाता तालुक्यातील सावळीविहिर बु ।।येथे बेल पोळा आनंदात साजरा करण्यात आला ,करुणा चे सावट असताना  व आर्थिक मंदी चा फटका देखील शेतकरी राजाला बसला परंतु ज्याच्या जीवावर  आपली उपजीविका आहे अशा या सर्जा राजाचा जोडी साठी ऋण काठून सण करण्यात शेतकरी मागे पडला नाही ,सावलीविहिर येथे गावातील हनुमान मंदिरात आज दिवसभर लगभग पहावयास मिळाली 

रंगी बेरंगी फुले ,शिंगाना कलर, गळ्यात माळ, घुंगरू चा आवाज, आज बेल राजा सजला होता , दुकानात ,बाजारातही आर्थिक मंदी पहावयास मिळाली,परंतु शेतकरी राजाने आपल्या सर्जा राजाला आनंदात सजून वाजत गाजत त्याची गावातून मिरवणूक काढुन  हनुमान मंदिरात दर्शना साठी आणले या प्रसंगी अनेकांनी आंनदाने नारळ मंदिरात फोडून प्रसाद वाटला ,काहीतर डीजे च्या तालावर थिरकले आज मोठ्या प्रमाणात शेतकरी समाधान झाल्याचे चित्र पहावयास मिळत होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News