स्नेहबंधने शिक्षकांचा केलेला सत्कार म्हणजे चांगल्या कार्याचा गौरव - उपायुक्त यशवंत डांगे


स्नेहबंधने शिक्षकांचा केलेला सत्कार म्हणजे चांगल्या कार्याचा गौरव - उपायुक्त यशवंत डांगे

अहमदनगर( प्रतिनिधी संजय सावंत) 

संस्कारशील विद्यार्थ्यांना घडवण्यात शिक्षकांची भूमिका निश्चितच महत्वाची आहे. शिक्षकांनी आपले कार्य प्रामाणिकपणे केले तर समाजही शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करतो. शिक्षकदिनाच्या निमित्ताने स्नेहबंध फांऊडेशनने महानगर पालिका शाळेतील मुख्याध्यापकांचा केलेला सत्कार म्हणजे शिक्षकांच्या चांगल्या कार्याचा समाजाने केलेला गौरव असल्याचे प्रतिपादन महापालिका उपायुक्त यशवंत डांगे यांनी केले. स्नेहबंध फौंडेशनच्या वतीने लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालय, रिमांड होम, येथील महानगर पालिका शाळेतील मुख्याध्यापकांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचा निश्चित मोठा वाटा असून शिक्षकांची भूमिका मुर्ती घडवणा-या कारागीराप्रमाणे असते. विद्यार्थ्यांमध्ये चांगले रूजविण्याचे कार्य शिक्षकांचे असल्याचे प्रशासन अधिकारी सुभाष पवार यांनी सांगितले.

    ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचा खरा आधारस्तंभ म्हणून शिक्षक वाडीवस्तीवर प्रतिकुल परिस्थितीतही अत्यंत प्रामाणिकपणे काम करतोय,आज ग्रामीण भागातील विद्यार्थी जे यश मिळवत आहेत त्यात शिक्षकांचा वाटा मोठा असल्याचे स्नेहबंध चे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी यावेळी सांगीतले.याप्रसंगी स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे, पर्यवेक्षक जे एन पठाण, श्रीम.गहिले, श्रीम.शेवाळे, सौ.बारगळ, हेमंत ढाकेफळकर, सचिन पेंडुरकर, संकेत शेलार आदी उपस्थित होते.

     मुख्या.भाऊसाहेब कबाडी यांनी स्नेहबंधच्या माध्यमातून जे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात त्याची माहिती दिली. मुख्या.शशिकांत वाघुलकर यांनी प्रास्ताविकातून अतिथींचा परिचय करून दिला.

    याप्रसंगी शिक्षकदिनानिमित्ताने स्नेहबंध फौंडेशनच्या वतीने पालिकेतील सर्व मुख्याध्यापकांचा वृक्षरोप भेट देऊन आगळावेगळा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News