शिक्षक दिना निमित्त नेहरू उर्दु सेंटर, तरक्की ए उर्दु व उर्दु बचाव कडून आदर्श शिक्षक पुरस्कार


शिक्षक दिना निमित्त नेहरू उर्दु सेंटर, तरक्की ए उर्दु व उर्दु बचाव कडून आदर्श शिक्षक पुरस्कार

समनापुर:-(प्रतिनिधी )शिक्षक दिनाचे औचित्य साधून तरक्कि ए उर्दू आवामी तहेरीक, जवाहरलाल नेहरू सेंटर व  उर्दू बचाव समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नुकताच आदर्श शिक्षक पुरस्कार समनापुर येथील जिल्हा परिषद  उर्दू शाळेचे मुख्याध्यापक महेमूद सर उर्फ गुलाब सर यांना देण्यात आला, त्याच बरोबर मरहूम आमेना पीर महंमद शेख यांनाही मरणोत्तर आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. तसेच उर्दू भाषेतून शिक्षण घेऊन डी.फार्मसी या कोर्स मध्ये 93.40  टक्के गुण मिळवून इथापे फार्मसी कॉलेजची विद्यार्थिनी फरहानाज शेख तिला देखील सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार, संगमनेर साहीत्य परिषद चे अध्यक्ष अरविंद भाऊ गाडेकर हे होते प्रमुख उपस्थिती उर्दू बचाव समितीचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल्ला हसन चौधरी, तरक्कि ए उर्दू आवामी तहेरीकचे संस्थापक अध्यक्ष  राजमोहम्मद शेख, जवाहरलाल नेहरू सेंटर संस्थापक अध्यक्ष इदरीस भाई शेख, महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे घाटकोपर तालुका अध्यक्ष असिफ अली सय्यद, बिंदास न्यूजचे संपादक असलम बिनसाद, पत्रकार संघाचे श्रीरामपूर तालुका कार्याध्यक्ष कासम भाई शेख, बेलापूर शहर अध्यक्ष एजाज भाई सय्यद, उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सादिक भाई, उपाध्यक्ष अकबर भाई, राजू भाई, आसिफ भाई आदी मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचलन मतीन मनियार सर यांनी केले, प्रस्ताविक इदरीस भाई यांनी केले.अब्दुल्ला भाई चौधरी यांनी आपल्या भाषणात सर्वाना मंत्र मुग्ध केले शेर शायरी ने कार्यक्रमाची चांगलीच शोभा वाढली सोशल डिस्टनस चे पालन करीत मोजक्या लोकात कार्यक्रम संपन्न झाला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News