शेतकऱ्यांचे कैवारी भराट यांचे अल्पशा आजाराने निधन


शेतकऱ्यांचे कैवारी भराट यांचे अल्पशा आजाराने निधन

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण :माजी निवृत्त शेवगाव कक्ष अधिकारी म्हणून नावलौकिकास असलेले काका नावाने परिचित असणारे विनायक दशरथ भराट यांचे शनिवारी सायंकाळी आठ वाजता नगर या ठिकाणी अल्पशा आजाराने निधन झाले व त्यांना आज एक कर्तव्यदक्ष अधिकारी ते आदर्श शेतकरी असे परिचित असणारे त्यांच्या राहते गावी रावतळे कुरुडगाव या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी परिसरातील गोरगरीब शेतकऱ्यांना शासनाच्या विविध  योजनांचा लाभ मिळवून देण्यामध्ये भराट साहेबांचा मोठा सहभाग असल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भराट साहेब यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेवगाव शहरातील व तालुक्यातील मोठ्या प्रमाणात अंत्यविधीसाठी सकाळपासूनच हजर होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत भराट यांचे ते वडील होते त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, दोन मुली,पुतणे व नातवंड असा मोठा परिवार आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News