झाड कोसळले असे दाखवुन ते पाडण्यात आले असल्याचा आरोप करत मनसेचे उपजिल्हाध्यक्ष महिबुब सय्यद,प्रवासी संघाचे अनिल बांडे यांनी केली दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी


झाड कोसळले असे दाखवुन ते पाडण्यात आले असल्याचा आरोप करत मनसेचे उपजिल्हाध्यक्ष महिबुब सय्यद,प्रवासी संघाचे अनिल बांडे यांनी केली दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी

शिरूर | प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे )

      " झाडे लावा झाडे जगवा "ही संकल्पना तर बाजूला राहिली पण नुतनीकरणाच्या नावाखाली आहे ती झाडे तोडण्यास सुरवात झाली.शिरूर बस स्थानकातील खोदाईचे काम करत असताना येथील जुने मोठे झाड वर्दळीच्या रस्त्यावर उनमळुन कोसळल्याने नागरिकांची जीव वाचविण्यासाठी सगळ्याचीच धावपळ झाली होती सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.

             शिरूर बस स्थानकाच्या नुतनीकरणाच्या काम सध्या सुरू आहे.तसेच बस स्थानकासमोरून जाणा-या शहरातील जुन्या पुणे नगर रस्त्याचेही काम सुरू आहे.या रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतुक बी.जे.काॅर्नरपासुन वळवण्यात आलेली आहे.त्यामुळे रेव्हेन्यू काॅलनीतुन बाजार समितीकडे जाणा-या या रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात वाहनांची व नागरिकांची वर्दळ असते.याच रस्त्यावर बस स्थानकाच्या मागील बाजुच्या भिंतीला लागुन फुटपाथवर भाजीपाला विक्रेते बसतात.बस स्थानकाच्या याच भिंती लगत ठेकेदार यांचे कामगार जेसीबीच्या सहाय्याने खोदाई काम करत असताना भिंती लगत असलेले जुन्या मोठ्या झाड्याच्या मुळ्या मोकळ्या झाल्या असुन ते कोसळुन मोठा आपघात होण्याची शक्यता असल्या बाबत येथील काम करणा-यांना कल्पना दिली होती असे येथील नागरिक बोलुन दाखवत होते.मात्र नागरिकांच्या सुचनेकडे दुर्लक्ष करून येथील काम सुरू असतानाच हे झाड कोसळले यावेळी भिंती लगत बसलेल्या भाजी पाला विक्रेत्यांची जीव वाचवण्यासाठी एकच धावपळ झाली.सुदैवाने या घटनेत जीवीतहानी झाली नाही.परंतु ठेकेदाराच्या निष्काळजी पणामुळे झाड पडुन विद्युत पोल व तारा तुटून झाड रस्त्यावर कोसळले असुन यात कोणाला जीवीत हानी झाली असती तर याला जबाबदार कोन..? कल्पना देऊन देखील निष्काळजीपणे काम सुरू ठेवले असल्याच्या तीव्र भावना यावेळी नागरिक व्यक्त करून दाखवत होते.


      बस स्थानकातील झाडे काम करत असताना अडथळा ठरत असल्याच्या नावाखाली संबंधीत ठेकेदार यांना काढायचेच होते.झाडांचा विस्तार कमी करत असताना किमान दहा झाडे लावण्याची बांधकाम परवानगी देताना त्यात स्पष्ट अट घालण्यात आलेली असुन अद्याप पर्यंत एकही झाड लावण्यात आलेले नसुन सदर झाडांचा विस्तार कमी करण्याची परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी शिरूर नगरपरिषदेला दि.४ सप्टेंबर २०२० रोजी निवेदन देऊन करण्यात आलेली असुन जाणीवपूर्वक हे झाड कोसळले असे दाखवुन ते पाडण्यात आले असल्याचा आरोप मनसेचे उपजिल्हाध्यक्ष महिबुब सय्यद,प्रवासी संघाचे अनिल बांडे यांनी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News