कोविड काळातील शिक्षकांचे योगदान महत्वाचे - सभापती डॉ. क्षितिज घुले


कोविड काळातील शिक्षकांचे योगदान महत्वाचे - सभापती डॉ. क्षितिज घुले

शेवगाव  प्रतिनिधी सज्जाद पठाण:  तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या  सर्वच प्राथमिक  शिक्षकांनी कोविड संकट काळात शाळेबरोबरच विविध ठिकाणी आपली सेवा समर्पित भावनेने देऊन एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे असे गौरवोद्गार  शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांनी व्यक्त केले.

       शेवगाव पंचायत समिती   शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या शिक्षक गौरव सप्ताह निमित्त रविवारी ( ५) शिक्षक दिन वेबिनार मध्ये मार्गदर्शन करताना डॉ. घुले बोलत होते.   

    यावेळी सभापती डॉ.   घुले म्हणाले की, तालुक्यातील शिक्षक कोविड काळात ही ऑनलाइन अध्यापन प्रभावीपणे करत असून  गोरगरिब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खंड पडू देत नाही. त्याच बरोबर प्राथमिक शिक्षक यांनी सामाजिक बांधिलकी, सामाजिक उत्तरदायित्व निभावत कोरोना रुग्णांना मदत केली. कोरोना काळात चेक पोस्ट, विलगिकरण कक्ष, लसीकरण यासह अनेक ठिकाणी सेवा समर्पित भावनेने दिली आहे.

     राज्याचे शिक्षण सह संचालक दिनकर टेमकर म्हणाले की, शिक्षकांच्या कार्याचा गौरव नेहमी होणे गरजेचे आहे.  लवकरच शिक्षण विभाग नेहमी प्रमाणे शाळा सुरू करण्याच्या विचारात आहे. कोविड काळात दीक्षा अँप या शासनाच्या  ऑनलाईन अभ्यासक्रम उपक्रमाचा फायदा अनेक शिक्षकांनी मुलाना दिला ही आनंदाची बाब आहे.      लहानपणी मिळालेल्या मेहनती शिक्षकांच्या  कामामुळे मी शिक्षण सह संचालक प्रवास करू शकलो.

   

      तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांनी प्रास्ताविक करत शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली. वेबिनार साठी तांत्रिक साहाय्य भुषण कुलकर्णी यांनी केले.  शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊळ यांनी आभार मानले.  सूत्रसंचालन गणपत दसपुते तर नियोजन रमेश गोरे व सहकाऱ्यांनी यांनी केले .

 -  तहसीलदार अर्चना पागिरे - भाकड या कांबी गावात पूरग्रस्त परिस्थिती पाहणी साठी रविवारी गेल्या होत्या.  व्यस्त परिस्थितीत त्यांनी शिक्षकांचे ऋण व्यक्त करत माझ्यासाठी  प्राथमिक शिक्षण अन प्राथमिक शिक्षक मैलाचे दगड आहे असे सांगत महसूल विभागात असे दिवस साजरे केले जात नाहीत. कारण एक शिक्षक हजारो तहसीलदार ,जिल्हाधिकारी  दरवर्षी निर्माण करत असतात. त्यामुळे शिक्षक दिन साजरा करून अशा गुणी शिक्षकांच्या  कार्याचा गौरव करणे उचित असते  असे मत त्यानी व्यक्त केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News