विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांचा समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान


विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांचा समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान

पुणे - कोरोनाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केल्याने विविध क्षेत्रातील लोकांचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे १०१ व्या जयंती निमित्ताने पुणे जिल्हा मांतग समाज समितीच्या वतीने सहकारनगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संयोजन राजाभाऊ धडे व संजय केंदळे यांनी केले होते. या दरम्यान माजी स्थायी समिती अध्यक्ष सुभाष जगताप, नगरसेवक अविनाश बागवे, राजाभाऊ धडे, संजय केंदळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 


  शैक्षणीक क्षेत्रात गुलाबराव नेटके तर स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाच्या काळात मृत्यू पावलेल्यांचा अंत्यसंस्कार केल्याने किरण मोहन लोंढे यांचा सत्कार केला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मातंग समाजाच्या मुले व महिलांनी शिक्षणापासून शिक्षण खंडित होवू नये म्हणून सविता थोरात आढगळे यांनी ऑनलाईन शिक्षण प्रबोधन केल्याने तसेच या दरम्यान मातंग समाजात सामाजिक प्रबोधन करणाऱ्या अंकिता दोडके, लीना लोंढे, ईशा आढगळे, पौर्णिमा लोखंडे, पल्लवी आढगळे, हर्षदा आढगळे त्यांचा सन्मान करण्यात आला. यांना स्मृतिचिन्ह शाल तसेच अण्णा भाऊ साठे समग्र वाड्मय खंड २ ची प्रत देवून गौरव करण्यात आला. 

या दरम्यान अभिनेते सुजित रणदिवे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी हनुमंत साठे, ऍड महेश सकट, ऍड. राजश्री अडसूळ, अनिल हातागळे, संतोष माने, संजय साठे, गणेश लोंढे, गणेश चांदणे, शाम चंदनशिवे, गणेश भालेराव विनोद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News