कनिष्ठ महाविद्यालय पद भरतीसाठी शिक्षक कृती समितीचे भीक मागो आंदोलन


कनिष्ठ महाविद्यालय पद भरतीसाठी शिक्षक कृती समितीचे भीक मागो आंदोलन

पुणे:महाराष्ट्र राज्य अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय पद भरती अजूनहि राज्य सरकारने केली नाही. त्यासाठी शिक्षकानीं पद भरती होवी यासाठी खूप प्रयत्न केले. पण अजूनही शासनाने पद भरती केली नाही . म्हणून 2 सप्टेंबरपासून शिक्षकांनी कनिष्ठ महाविद्यालय पद भरतीसाठी भीक मागो आंदोलन सुरू केले आहे. आजचा त्यांचा आंदोलनाचा चौथा दिवस आहे.

महाराष्ट्र राज्यातील 100 टक्के अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदांच्या शिक्षकांच्या मान्यता व वेतनाचा प्रश्न शासन दरबारी गेली पंधरा ते 17 वर्षापासून प्रलंबित आहे  हे प्रश्न राज्य सरकारने सोडवण्यासाठी शिक्षक कृती समिती 

पुण्यातील सेंटर बिल्डिंग येथे आंदोलन करत आहे.

हे आंदोलन  शिक्षक कृती समितीचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 2 सप्टेंबर पासून चालू आहे.

चार-पाच दिवस आंदोलन चालू असले तरी शिक्षण संचालक कार्यालयाचे लक्ष नाही.

या आंदोलनाला शिक्षक कृती समितीचे उपाध्यक्ष विनोद दानवे, सचिव अशोक हिंगे, बाळू पाटील, आबुल मोहसीन, श्यामसुंदर पाटकर, व शिक्षक कृती समितीचे शिक्षक उपस्थित आहेत.

सचिन चव्हाण म्हणाले, शिक्षकदिनी वाढीव पदावरील शिक्षकांवर ही वेळेने पुरोगामी महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. म्हणून आम्ही भीक मागो आंदोलन करत आहोत. राज्य सरकारने

15 ते 17 वर्षापासून शिक्षकांच्या मान्यता व वेतनाचा प्रश्न सोडवला नाही. सरकार नुसते आश्वासन देत आहे. पण मागण्या काही पूर्ण करत नाही.आम्ही आंदोलन यासाठी करत आहोत.

आम्ही आमचे काही बरे वाईट केल्यास याची सर्व जबाबदारी शासनाची राहील.  आम्ही सरकारला इशारा देत आहोत आमच्या मागण्या तर पूर्ण केल्या नाही तर. यापुढे आम्ही  आंदोलन करू.

शिक्षक कृती समितीच्या मागण्या

1) वाढीव पदाची माहिती अचूक व परिपूर्णत्या शासनाकडे पाठवावी.

2) शासनाने वाढीव पदांना वेतनासह त्वरित मंजुरी द्यावी.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News