संकल्प को-ऑप क्रेडीट सोसायटीच्या वर्धापनदिनानिमित्त वृक्षारोपण


संकल्प को-ऑप क्रेडीट सोसायटीच्या वर्धापनदिनानिमित्त वृक्षारोपण

लावलेल्या वृक्ष रोपांच्या सोबत "संकल्प" चा ही वटवृक्ष तयार ह्वावा;  उपस्थित मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा

पुणे, ५ सप्टेंबर: संकल्प को-ऑप क्रेडीट सोसायटीच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत व पर्यावरणाची स्थिती लक्षात घेऊन वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला. आज रविवार रोजी कोंढवे कोपरे गावातील राजमाता जिजाऊ स्मृतीवन येथे हे वृक्षारोपण करण्यात आले, यामध्ये औषधी वृक्षाचा देखील समावेश होता. तसेच दत्तक झाड योजनेचा देखील शुभारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रमा प्रसंगी संकल्पचे चेअरमन स्वप्नील घायाळ, उपाध्यक्ष शेखर ढमाले, सचिव ऋषीकेश मनोरे, सुमित गुळवे, ज़तिन गुजराथी, विकास प्रभुणे,विनायक दलभंजन, रविराज बुर्से, निखिल सिन्नरकर, तसेच मित्रपरिवार तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सचीन दोडके, शेतकरी कामगार पक्षाचे कोषाध्यक्ष राहूल पोकळे, पुणे जिल्हापरिषद सदस्या अनिता इंगळे, सरपंच सुरेशआण्णा गुजर, सुभाष नानेकर, नितीन धावडे आदी मान्यवर उपस्थित होते. आज लावलेल्या वृक्षाच्या रोपा सोबत संकल्पचा ही वटवृक्ष तयार हो अशा शुभेच्छा उपस्थितीत मान्यवरांनी वर्धापनदिनानिमित्त संकल्पच्या टीमला दिल्या. संकल्पचे अध्यक्ष स्वप्नील घायाळ म्हणाले, संकल्प को-ऑप क्रेडीट सोसायटी चे ​संकल्प उद्याचा, उज्ज्वल भविष्याचा हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु केलेली ही पतसंस्थेने एक वर्षाच्या कालावधीतच लोकांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी वाटचाल सुरु केली आहे. एकीकडे लोकांना गुंतवणुकीचे मार्ग कमी होत असताना संकल्प को-ऑप क्रेडीट सोसायटीने नवनवीन योजना बाजारामध्ये आणून छोट्या गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. तसेच कमी व्याजदराच्या कर्ज योजना आणून देखील छोटया व्यावसायिकांना दिलासा देण्याचे काम केले आहे.​ कोरोना महामारीमध्ये नवीन व्यवसाय सुरु करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांना कमीत कमी कागदपत्रांमध्ये कर्ज देण्याची योजना संकल्प मध्ये उपलब्ध आहे. आज लावलेल्या वृक्षाची संगोपनाची जवाबदारी देखील आमची आहे. प्रत्येक झाड जगवणार आणि मोठे करणार असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News