पुणे नेत्ररोगतज्ञ संघटनेच्या वतीने नेत्रदान जनजागृती..राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा अंतर्गत उपक्रम


पुणे नेत्ररोगतज्ञ संघटनेच्या वतीने नेत्रदान जनजागृती..राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा अंतर्गत उपक्रम

पुणे :नेत्ररोगतज्ज्ञ संघटनेतर्फे,लायन्स क्लब ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी  यांच्या सहकार्याने  राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त नेत्रदान जनजागृती कार्यक्रम रविवार ५ सप्टेंबर रोजी सारसबाग,टिळक रोड,स्वारगेट या परिसरात घेण्यात आला. या कार्यक्रमा अंतर्गत नेत्रदान विषयी माहिती देण्यात आली व करोनाचे प्रादुर्भाव टाळण्यासाठी एन-95 मास्क नागरिकांना वाटण्यात आले.पुणे नेत्ररोगतज्ज्ञ  संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय टेकवाडे, मानद सचिव डॉ.ऋजुता माचवे,खजिनदार डॉ.सीमा खैरे, डॉ.अश्विनी मिसाळ,डॉ.प्रांजली थरकुडे,डॉ.देविका जोशी,डॉ.नितिका त्रिपाठी,डॉ. निरुपा टिंबळे उपस्थित होते.नेत्रदानाचा संदेश असलेले ५०० हून अधिक मास्क वाटण्यात आले. डॉ.संजय टेकावडे व डॉ.ऋजुता माचवे यांनी पुणे परिसरात बुबुळाच्या विकाराने अंधत्व आलेल्या रुग्णांची संख्या,त्यांना लागणारे कॉर्निया याची माहिती दिली व समाजामध्ये जास्तीतजास्त नेत्रदान करण्यासाठी आवाहन केले. पुणे नेत्ररोगतज्ज्ञ  संघटना डॉ.संजय टेकावडे यांच्या अध्यक्षतेखाली गेले वर्षभर नेत्ररोग तज्ञांचे विविध शैक्षणिक सेमिनार घेऊन नेत्ररोग आजार व नेत्ररोग शस्त्रक्रियामधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याची माहिती देत आहेत.तसेच करोनाच्या काळामध्ये डोळ्यांचे होणारे विकार व म्युकॉरमायकॉसेस सारखे घातक आजार यामध्ये होणारे  डोळ्यांचे इन्फेक्शन या बाबत नवीन  इलाज पद्धती विकसित करून त्यांची माहिती सभासदांना सेमिनार द्वारे देत आहेत.करोनापासून डोळ्यांचे संरक्षण याची माहिती लोकांना रेडिओवर व पुणे डिस्ट्रीक्ट डॉक्टर असोसिएशनच्या सभासदांना  विविध माध्यमातून माहिती दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News