प्रशासन पुरस्कृत अत्याचाराने आघाडी सरकारचा जातीयवादी चेहरा उघड- अँड.नितीन पोळ


प्रशासन पुरस्कृत अत्याचाराने आघाडी सरकारचा जातीयवादी चेहरा उघड- अँड.नितीन पोळ

कोपरगाव प्रतिनिधी /राजेंद्र तासकर

महाराष्ट्रात मातंग समाजावर प्रशासन पुरस्कृत अत्याचार होत असून यातून महाराष्ट्रातील आघाडी सरकारचा जातीयवादी चेहरा उघड झाला आहे अशी टिका लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष  अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे

आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले मागील पाच वर्षे राज्यात भाजप शिवसेनेच्या युतीचे सरकार सत्तेवर होते त्यांच्या काळात देखील मातंग समाजावर मोठ्या प्रमाणावर अत्याचार झाले मागील दोन वर्षांपासून राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर आले मात्र तरी देखील मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची संख्या कमी झाली नाही याउलट मातंग समाजावर जातीय मानसिकतेतून होणाऱ्या अन्याय अत्याचारामध्ये वाढ झाली असून पुरोगामीत्व पणाचा बुरखा पांघरूण सरकार मातंग समाजावर अन्याय करत आहे 

नुकतीच माळशिरस येथे मातंग सरपंचाच्या मृत देहास सार्वजनिक स्मशान भूमीत अंत संस्कार करू दिला नाही पोलीस व महसूल प्रशासनाच्या समक्ष अंत संस्कार करण्यास विरोध झाला म्हणून लहू सैनिकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंतविधी केला  त्यावेळी पीडित कुटुंबातील सदस्यांवर गुन्हा दाखल केला तर दोन दिवसापूर्वी गउळ ता कंधार येथे अण्णा भाऊ साठे स्मारकाच्या नियोजित व ग्रामपंचायत उतारा असलेल्या जागेत समाज बांधवांनी अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा बसवला असता पोलीस प्रशासनाने पुतळा काढून घेतला व समाज बांधवांना पोलिसांनी अमानुष मारहाण केली तसेच नुकतीच कोपरगाव येथे मुस्लिम कुटुंबाने मातंग महिलांना अमानुष मारहाण केली त्यात देखील पोलिसांनी मातंग समाजाच्या अट्रोसिटी प्रमाणे गुन्हा दाखल करण्याच्या मागणी कडे दुर्लक्ष केले, प्रतिनिधीक स्वरूपात या दोन तीन घटना असल्या तरी रोजच मातंग समाजातील महिला पुरुष यांना जातीय मानसिकतेतून त्रासाला सामोरे जावे लागत आहे मातंग समाजावर अन्याय अत्याचार होत असताना पोलीस प्रशासन आंदोलन दडपून टाकत असून ज्यांच्या कडून न्यायाची अपेक्षा करायची तेच जर अन्याय करत असतील तर समाज बांधवांनी न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न निर्माण झाला मात्र या विषयावर सरकारचे प्रतिनिधी म्हणून कोणीच भूमिका स्पष्ट करायला तयार नाही तसेच एवढया भीषण घटना घडलेल्या असताना कोणीही प्रतिनिधी पीडित कुटुंबाला भेट द्यायला गेला नाही  सरकारने मातंग समाजातील पुरुष व महिलांवर होणारे अत्याचार पोलिसी धाक दाखवून दडपून टाकत असून सद्या महाराष्ट्र शासन मातंग समाजावर प्रशासन पुरस्कृत अन्याय करत असून यातून सरकारचा जातीयवादी चेहरा समोर येत आहे मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापने पासून जातीयवादी घटनेत वाढ झाली असल्याचे विधान केले होते मात्र आजची परिस्थिती पाहता त्यातील सत्यता  दिसून येत असून अशीच परिस्थिती राहिली तर आगामी काळात मातंग समाजातील कार्यकर्ते व नागरिक एकही मंत्र्याला रस्त्यावर फिरून देणार नाही असा इशारा दिला आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News