ज्ञानोदय बहुउद्दशीय संस्थेद्वारा राज्यस्तरीय २०२०-२१आदर्श उपसरपंच म्हणुन .. यांचा पुरस्काराने गौरव


ज्ञानोदय बहुउद्दशीय संस्थेद्वारा राज्यस्तरीय २०२०-२१आदर्श उपसरपंच म्हणुन .. यांचा पुरस्काराने गौरव

कोपरगाव प्रतिनिधी /राजेंद्र तासकर 

     कोपरगाव विधान सभा मतदार संघाचे मा.आमदार श्री आशुतोषदादा काळे यांच्या ताब्यात असलेल्या एकूण ग्रामपंचायतींपैकी  कुंभारी ग्रामपंचायतचे आदर्श उपसरपंच दिगंबर गोपिनाथ पाटील बढे यांना, ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्था द्वारा देण्यात येणारा राज्यस्तरीय   २०२०-२१चा पुरस्कार हा त्यांच्या उल्लेखनीय, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्याबद्दल देण्यात आला. सदर पुरस्कार हा श्रीरामपुरचे आमदार श्री. लहुजी कानडे साहेब व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

        सदर प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना सत्कारमुर्ती बढे म्हणाले की,आमचे कोपरगावचे युवा नेते आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतांना त्यांच्यापासुन सामाजिक कार्याची प्रेरणा सदोदित मिळत असल्यामुळे व तळागाळातील गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी मिळाल्याने ग्रामविकासाच्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्याचे काम आमदार साहेबांच्या माध्यमातुन व सहकार्याने पूर्ण करू शकलो. 

      श्री.दिगंबर बढे हे शेतकरी कुटुंबातील असल्याने शेती विषयी आवड निर्माण झाली. आपले ग्रॅज्युशनपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले परंतु नोकरीला महत्व न देता ,आपल्या  वडिलोपार्जित शेती व्यवसायाला महत्व दिले. त्यामुळे त्यांची कृषी क्षेत्राशी नाळ जोडली गेलेली असल्याने व  समाज सेवेची आवड असल्याने ते कुंभारी नं.२सोसायटीचे संचालक तसेच राघवेश्वर दुध संस्थेचे संचालक म्हणुन कार्यरत आहे. त्याचप्रमाणे मागील वीस वर्षापासून ते शिवसेनेचे उपतालुका विभागप्रमुख होते.तालुक्यातील जनतेशी त्यांचा दांडगा लोकसंपर्क असल्याने कुंभारी बरोबरच संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या माध्यमातून गावाचे नाव राज्य पातळीपर्यंत पोहचल्याने ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे .

    त्यांच्या या पुरस्काराबद्दल माजीआमदार श्री.अशोक दादा काळे व मा.आमदारश्री.आशुतोष दादा काळे व शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजीराजे ठाकरे, बाळासाहेब रहाणे , बाळासाहेब जाधव, प्रविण शिंदे आदिंनी अभिनंदन केले आहे .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News