ग्रामीण भागातील रस्ते चांगले असतील तर शेतकऱ्याचा माल लवकर बाजरात जाईल - जगताप


ग्रामीण भागातील रस्ते चांगले असतील तर शेतकऱ्याचा माल लवकर बाजरात जाईल -  जगताप

श्रीगोंदा प्रतिनिधी अंकुश तुपे

तालुक्यातील पिंपळगाव पिसा ते विष्णुचा वाडा रस्ता १.५० कि.मी. चा  शुभारंभ श्रीगोंदा- नगर मतदार संघाचे मा.आमदार तथा अहमदनगर जिल्हा सह. बॅंकेचे संचालक राहुलदादा कुंडलिकराव जगताप. यांच्या शुभहस्ते पार पडला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मा.आ. राहुलदादा जगताप  यांच्या विशेष प्रयत्नातुन सदर रस्त्यासाठी निधी रक्कम रु. १०९ लक्ष मंजुर करण्यात आला आहे. 

  ग्रामीण भागातील जनतेसाठी रस्ता हा महत्वाचा घटक आहे. रस्ते चांगले असतील तर आपला शेतीमाल वेळेत बाजारपेठे पर्यंत पोहचवणे त्यांना सहज शक्य होते. वेळेत माल बाजारपेठेत पोहचला तर बाजारभाव देखील चांगला मिळतो. त्यामुळे रस्ता हा विकासाच्या दृष्टीने महत्वाचा घटक आहे. त्यामुळे मतदार संघातील रस्त्यांचे जाळे मजबुत करण्याच्या दृष्टीने प्रथम प्राधान्याने काम करण्यावर माझा भर आहे. येथील स्थानिक नागरीकांची अनेक दिवसांपासुन या रस्त्याच्या कामाची मागणी होती. त्यानुसार पाठपुरावा करुन आज या रस्त्याच्या कामाचा प्रत्यक्षात शुभारंभ झाला याचा मला देखील आनंद आहे. असे मत माजी आमदार  जगताप  यांनी यावेळी व्यक्त केले.

  यावेळी माऊली कदम, संचालक सचिन कदम, प्रमोदनाना जगताप, सरपंच सुभाष पदंकर, पंढरीनाथ कदम, नितीनराव शिंदे, संतोष कदम, संभाजी महाराज दरोडे, बापू कदम, अनील कदम, अण्णा कदम, संजय जाधव, भास्कर कदम, रावसाहेब कदम, भोर मेजर, विनायकराव जगताप, एकनाथराव खामकर, दादासाहेब शिंदे, नारायणराव शिंदे, बबन शिंदे,गोरख शिंदे, रमेश शिंदे, उमेश जगताप, गणेश पदंकर, गणेश कदम, अमोल जगताप, बापूराव पदंकर, सचिन पदंकर, दत्तात्रय कदम, सुभाष कदम, प्रकाश कदम, तुकाराम पंदरकर, श्रीकांत पंदरकर, सुनिल पंदरकर अजीनाथ जगताप, बबनराव पदंकर, आबासाहेब पंदरकर, महादेव मांडगे व पिंगळगाव पिसा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News