पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेणाच्या गोव-या राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसने पाठविल्या .. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसने केले गॅस दरवाढीविरोधात आंदोलन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेणाच्या गोव-या राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसने पाठविल्या .. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसने केले गॅस दरवाढीविरोधात आंदोलन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :पिंपरी (दि. 4 सप्टेंबर 2021) 2014 साली 410 रुपयात मिळणारा घरगुती गॅस आता 884 रुपयाला मिळत आहे. 2014 पुर्वी गॅसच्या दरात शुल्लक दरवाढ झाली तरी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणा-या स्मृती ईराणी सारख्या भाजपच्या इतर खासदार व आमदार आता कुठे गायब झाल्या असा प्रश्न पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी उपस्थित केला.

         शनिवारी (दि. 4 सप्टेंबर) चिंचवड स्टेशन येथे वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने घरगुती गॅसच्या किंमतीत केलेल्या दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्पिड पोस्टव्दारे शेणाच्या गोव-या भेट म्हणून पाठविण्यात आल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्षा ॲड. वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी विधानसभा मतदार संघातील कविता खराडे, सविता धुमाळ, दिपाली देशमुख, मीरा कुदळे, अश्विनी पोळ यांनी चिंचवड पोस्ट ऑफीस येथे आंदोलन केले. तसेच चिंचवड विधानसभा संघातील महिलांनी चापेकर चौक येथिल पोस्ट ऑफीस समोर पुष्पा शेळके आणि संगिता कोकणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात पौर्णिमा पालेकर, ज्योती निंबाळकर, अनिता गायकवाड, स्वप्नाली असोले, उषा चिंचवडे, उज्वला वारीने, सुजाता पाटील, मनीषा शहा, सुप्रिया सरोदर, सुवर्णा वाळके यांनी सहभाग घेतला. तसेच भोसरी पोस्ट ऑफीस समोर पुणे जिल्हा निरीक्षक कविता आल्हाट आणि भोसरी विधानसभा अध्यक्षा मनिषा गटकळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात यावेळी नगरसेविका अनुराधा गोफणे तसेच संगीता आहेर, सपना घाडगे, पूनम वाघ, मनिषा जड़र, सोनम पोटवड़े, सारिका ढमें, सुनीता कालोखे, मेधा पळशीकर, अंजली हवलदार, वैशाली पवार, ज्योती मधुरकर, संगिता जाधव, सिंधु जाधव, स्मिता विधाते, अंजना नाइकरे, हेमलता कदम, साक्षी देशपांडे, शोभा औटी यांनी सहभाग घेतला होता.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News