हिंद कामगार संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 253 रक्त बाटल्यांचे संकलन


हिंद कामगार संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 253 रक्त बाटल्यांचे संकलन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

पिंपरी, पुणे (दि. 3 सप्टेंबर 2021) हिंद कामगार संघटनेच्या 14 व्या वर्धापनदिनानिमित्त कामगार नेते डॉ. कैलास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 2 सप्टेंबर) खराळवाडी, पिंपरी येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 253 रक्तदात्यांनी रक्तदान केले. संकलीत बाटल्या वायसीएम रुग्णालयाची रक्तपेढी आणि मोरया रक्तपेढीमध्ये देण्यात आल्या. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते डॉ. कैलास कदम, माजी नगरसेवक सद्‌गुरु कदम,  इंटकचे पुणे जिल्हा सरचिटणीस मनोहर गडेकर हिंद कामगार संघटनेचे उपाध्यक्ष शांताराम कदम, सरचिटणीस यशवंत सुपेकर, खजिनदार सचिन कदम, ज्येष्ठ नागरीक निवृत्त कॅप्टन श्रीपत कदम, अशोक कदम, मनोहर यादव, पांडूरंग कदम, ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष आनंदा फडतरे आदी उपस्थित होते. हिंद कामगार संघटनेच्या पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण, महाळूंगे, रांजणगाव, जेजुरी, लोणावळा, खोपोली, रोहा, रायगड, मुंबई येथिल युनिट प्रतिनिधींनी व कोकण विकास महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.

         डॉ. कैलास कदम हे इंटक या राष्ट्रीय कामगार संघटनेचे राष्ट्रीय सचिव तसेच पुणे जिल्हाध्यक्ष आणि हिंद कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रसिध्दी व इतर अवांतर खर्च टाळून खराळवाडी, गांधीनगर प्रभाग क्र. नऊ मध्ये पाच सप्टेंबर पर्यंत मोफत धुरीकरण, औषध फवारणी, सॅनिटायझरचे वाटप करण्यात येत आहे अशी माहिती हिंद कामगार संघटनेचे सरचिटणीस यशवंत सुपेकर यांनी दिली आहे.

    या कार्यक्रमाच्या आयोजनात हिंद कामगार संघटनेचे पदाधिकारी, प्रतिनिधी तसेच कोकण विकास महासंघाच्या सभासदांनी सहभाग घेतला होता. तसेच चंद्रशेखर होनशाळ, राजेश दळवी, अवधुत कदम, अमृत जाधव, आनंद साळवी, जितेंद्र पवार, शांताराम कदम, प्रा. संदिप कदम, प्रा. गणेश गोरीवले, गजानन मोरे, रुपेश मोरे, अरुण यादव, अभिजित कदम, ज्ञानदेव पवार, संजय मोरे, रुपेश कदम, विजय राणे, सुरेश संदूर, विकास धवन, संतोष पवार, राजू पातोंड, अमोल पाटील, नवनाथ नाईकनवरे, विलास खरात, हमीद इनामदार, विनोद वाघ, तानाजी लोखंडे, सुरेश सरडे, सुनिल मोहिते, रोहिदास करपे, समिर गुरव, संतोष आरबेकर, दत्ता पवार, संदीप कटारीया, अमित मोरे, अभिजित मोरे, अतुल दाभोळकर, प्रतुल घाडगे, गणेश जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News