धनुष्यबाण हाच शिवसेनेचा उमेदवार शिवसेना कार्यकत्यांचा विश्वास; मंडई विद्यापीठ कट्ट्यावर शिवसैनिकांनी मांडली भूमिका


धनुष्यबाण हाच शिवसेनेचा उमेदवार शिवसेना कार्यकत्यांचा विश्वास; मंडई विद्यापीठ कट्ट्यावर शिवसैनिकांनी मांडली भूमिका

पुणे, ४ सप्टेंबर: सार्वत्रिक निवडणुकीमध्ये व्यक्ती किंवा चेहरा पाहिला जात नाही, तर धनुष्यबाण हाच शिवसेनेचा उमेदवार समजून शिवसैनिक काम करतात आणि पुढेही करतील. आगामी पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेचाच चष्मावर राहील, असा विश्वास आज पुण्यातील शिवसैनिक पदाधिकार्यांनी मंडई विद्यापीठ कट्टावर मांडला. मंडई विद्यापीठ कट्टाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे समाजातील यांनी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हीजन २०२२ च्या अनुषंगाने संवाद सत्राचे आयोजन केले होते.  प्रसंगी संजय मोरे (शिवसेना पुणे शहर प्रमुख), गजानन थरकुडे(शिवसेना पुणे शहर प्रमुख), अजय भोसले, विजय देशमुख (जिल्हाप्रमुख) रमेश कोंडे (जिल्हाप्रमुख), प्रशांत बधे, पृथ्वीराज सुतार (गट नेते, पुणे मनपा), शाम देशपांडे आदी उपस्थित होते. मंडई विद्यापीठ कट्टा,पुणे चे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांनी सर्व मान्यवरांचे सत्कार व सन्मान केला.  

संजय मोरे म्हणाले, कोरोना महामारीचे सावट संपले नाही, त्यामुळे घर हेपण एक मंदिरच हीच सामान्य नागरिकांची भावना आहे. गणेशोत्सवही त्याच पद्धतीने साजरा होईल. मात्र, महापौर दुटप्पी भूमिका घेऊन नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. भाजपच्या आंदोलनामधे महापौरांनी मंदिर उघडा म्हणून घंटानाद करायचा आणि श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या कार्यक्रमामधे महापौर म्हणून पुणेकरांना गर्दी न करण्याचे आवाहन करायच. पुणेकर नागरिक सूज्ञ आहेत, त्यामुळे कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मा चंद्रकांतदादा पाटील यांनी पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा केली. दादांनी हे लक्षात घ्याव, निवडणुकीआधी बंद दाराआड ज्यांनी शब्द दिला, जे ठरल त्यापासून निवडणूकीनंतर त्यांनी शब्द फिरवला  याला पाठीत खंजीर खुपसणे म्हणतात. १०१४ विधानसभा निवडणुकीत आपण ऐनवेळी युती तोडली याला पाठीत खंजीर खुपसणे म्हणतात. दादा आपणास विस्मरण होऊ लागले आहे. असे संजय मोरे यांना विचारलेल्या प्रश्नावर सांगितले. 


गजानन थरकुडे म्हणाले की, युती सरकार असताना भाजपने शिवसेनेला सतत मागे खेचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पुण्यात शिवसेनेचे कमी नगरसेवक निवडून आले. आगामी निवडणुकीत शिवसेना भाजपला जागा दाखवून देईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


पृथ्वीराज सुतार म्हणाले की, पालिकेत शिवसेनाच्या पुढाकारामुळे कापडी पिशवी वाटपाचे पितळ उघडे केले. शिवसैनिक जात-पात धर्म पाहात नाही, तर व्यक्ती म्हणून सामान्यांच्या मदतीसाठी आघाडीवर आहे आणि पुढेही राहील, असे त्यांनी सांगितले.


रमेश कोंडे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द होता, धनुष्य बाण हाच शिवसेनेचा उमेदवार आहे. त्यामुळे आम्ही व्यक्ती पाहात नाही, धनुष्य बाणासाठी काम करत आहोत आणि भविष्यातही करत राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.


श्याम देशपांडे म्हणाले की, येत्या गणेशोत्वामध्ये पुण्यातील सर्वच गणेश मंडळांचे कार्यकर्ते शासनाने घालून दिेलेल्या नियमांचे पालन करून चांगला आदर्श घालून देतील. कोणत्याही भूलथापालांना पळी पडणार नाहीत. सामान्य नागरिकांसाठी घर हेच मंदिर आहे. कोरोनाचे सावट संपल्यानंतर पुन्हा जल्लोषात उत्सव साजरा करता येतील, असा सल्लाही त्यांनी सामान्य नागरिकांना दिला.


शिवसेना शहरप्रमूख संजय मोरे यांनी सांगितले की, भाजप भावनिक मुद्दा उपस्थित करून नागरिकांचे मन विचलित करीत आहे. दस्तुरखुद्द पुण्यनगरीचे प्रथम नागरिक महापौर दुहेरी भूमिका घेऊन कोरोना अजून वाढवत आहे. पुणेकर नागरिक हुशार आहेत, कोरोना महामारीचा ज्वर कमी झाला आहे. मात्र, संपला नाही, हे त्यांना माहिती आहे, त्यामुळे सामान्य नागरिकसुद्धा आरोग्याची काळजी घेऊन सण साजरा करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


डॉ. अमोल देवळेकर म्हणाले की, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांना कोविड-१९चे लसीकरण झाले आहे. मात्र, लहान मुलांना लस दिली गेली नाही. त्यामुळे प्रत्येकाने कोरोना व्हायरसपासून सावधानता बाळगण्याची गरज आहे. किरकोळ आजार जाणवला तरीसुद्धा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषधोपचार करून घेणे सर्वांच्याच हिताचे आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर असली तरी सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची सर्वदूर ओळख आहे. ही ओळख जपण्याचे काम मंडई विद्यापीठ कट्टाच्या माध्यमातून बाळासाहेब मालुसरे करीत आहेत, असे त्यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News