राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे पुण्यात गॅसदरवाढ विरोधात आंदोलन


राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे पुण्यात गॅसदरवाढ विरोधात  आंदोलन

पुणे:राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने  गॅसदरवाढ विरोधात  आज पुण्यात  आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने जे पेट्रोल डिझेल चे दर वाढवले आहेत त्यामुळे सामान्य जनतेला कोंडी चा सामना करावा लागत आहे.गेल्या 2-3 महिन्यात काँग्रेसने पण आंदोलन केले.राष्ट्रवादीने पण आंदोलन केले.आज पुण्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने  गॅसदरवाढ विरोधात    आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली  चाकणकर यांनी केले.हे आंदोलन आख्या राज्यभर करण्यात आले.

या आंदोलनात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने गॅसदरवाढ विरोधात पोस्टाने शेणाच्या गोवऱ्या  पंतप्रधान मोदीसाहेब यांना पाठवून जाहीर निषेध केला. हे आंदोलन पुण्यात सिटी पोस्ट ऑफिस, समाधान चौक येथे करण्यात आले.

या आंदोलनाला  राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पुणे अध्यक्ष मृणालिनी मृदन वाणी,सविता मारणे,अनीता पवार, नीता गलाडे ,मीना पवार, वकील जयश्री पा लवे,महानगरपालिकेतील महिला नगसेवक, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी ,व कार्यकर्ते उपस्थित होते. रूपाली चाकणकर म्हणाल्या,केंद्र सरकारने जी महागाई वाढवली आहे.गॅस दरवाद, पेट्रोल -डिझेल दरवाद यांमुळे सामान्य माणसाची आर्थिक कोंडी झाली आहे.क्या होगा तेरा वांदा असा प्रश्न मोदींना आम्हाला विचारयाचा आहे.मोदी सरकारने गॅस ची सबसिडी जाहीर केली होती त्याचे काय झाले असे प्रश्न मोदींना आम्हाला विचारयाचे आहेत.आमची केंद्र सरकारला एक विनंती आहे.तुमि पेट्रोल-डिझेल चे दर कमी करावेत.म्हणून आम्ही आज गॅसदरवाढ विरोधात पोस्टाने शेणाच्या गोवऱ्या  पंतप्रधान मोदीसाहेब यांना पाठवून जाहीर निषेध करत आहोत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News