पी एम आर डी ए च्या माध्यमातून राज्यसरकार कडून सर्वसामान्य शेतकऱ्यांचा गळा घोटण्याचा प्रयत्न भाजपाचा आरोप


पी एम आर डी ए च्या माध्यमातून राज्यसरकार कडून सर्वसामान्य शेतकऱ्यांचा गळा घोटण्याचा प्रयत्न भाजपाचा आरोप

विमल गार्डन, घोटावडे फाटा, पिरंगुट येथे भारतीय जनता पार्टी मुळशी तालुक्याच्या वतीने भारतीय जनता पार्टी मुळशी तालुका अध्यक्ष ॲड. विनायकजी ठोंबरे पाटील यांनी पी एम आर डी ए च्या आराखड्यासंदर्भात शेतकऱ्यांसाठी कायदेशीर मार्गदर्शन मेळावाचे आयोजन केले होते. या शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यासाठी मुळशीतील हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. 

या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी माजी राज्यमंत्री माननीय संजयजी (बाळा) भेगडे उपस्थित होते. ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टी मार्फत वकिलांची फौज उभी करून शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा लढला जाईल व शेतकऱ्याचा एकही रुपया खर्च न होऊ देता, ही कायदेशीर लढाई सुप्रीम कोर्टापर्यंत गेली तरी भारतीय जनता पार्टी न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. यासाठी जन आंदोलन उभे केले जाईल. बाळाभाऊंचा आरोप शिरुर व मुळशी अशा अनेक ठिकाणी पवार व सुळे यांच्या जमिनीवर माञ रहीवासी आणि सर्वसामान्य शेतकरी मात्र उपाशी हे सर्व कशासाठी? याच वेळी भाजपा पुणे कायदा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अँड. संजय सावंत पाटील यांनी या आरक्षणासंदर्भात हरकती कशी घ्यावी? हरकती ला कोणते पुरावे जोडावेत. हरकत मान्य झाली नाही तर पुढे काय करावे? कोणत्या आरक्षणाचे फायदे-तोटे काय आहेत. यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.

भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष गणेशतात्या भेगडे यांनी महाविकास आघाडीचा विरोध करून शेतकऱ्यांच्या जमिनी कशा बिल्डरांच्या घशात जातील यासंदर्भात केलेली ही तरतूद आहे. अशा शब्दात निषेध व्यक्त केला. या मेळाव्यात बहुसंख्य शेतकऱ्यांनी आरक्षणासंदर्भात आपल्या समस्या मांडल्या.

या मेळाव्यास उपस्थित माजी राज्यमंत्री माननीय संजयजी (बाळा) भेगडे, भाजपा पुणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष किरणजी दगडे पाटील, भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष गणेशतात्या भेगडे, भाजपा पुणे कायदा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अँड. संजय सावंत पाटील, भाजपा मुळशी तालुका अध्यक्ष ॲड. विनायकजी ठोंबरे पाटील, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्या भारतीताई विनोदे, पुणे जिल्हा भाजपा सरचिटणीस सुवर्णाताई जोशी, भाजपा पुणे जिल्हा किसान मोर्चा उपाध्यक्ष काळूरामजी गायकवाड, भाजपा पुणे जिल्हा कार्यालय मंत्री वसंतजी चोरघे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अनुपशेठ मारणे, भाजपा मुळशी तालुका महिला अध्यक्षा वैशालीताई सणस, उपाध्यक्ष तानाजी नाना हुलावळे, मनोहरजी सणस, उपाध्यक्ष मारुती कुरपे, उपाध्यक्ष समीर मारणे, उपाध्यक्ष संतोष साठे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष वेगरे गावचे सरपंच मिनाथ कानगुडे, रावडे गावचे सरपंच दीपक माझीरे, कार्यालयीन मंत्री आसदे गावचे उपसरपंच प्रविण भरम, अशोक सुर्वे, सुनील शिंदे, पांडुरंग जाधव, सुरेश ठोंबरे व भारतीय जनता पार्टीचे व युवा मोर्चाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News