सरकारने वेड्या सारखे जे नियम लावले -राज ठाकरे


सरकारने वेड्या सारखे जे नियम लावले -राज ठाकरे

पुणे:महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहराच्या वतीने शिवशाहीर करंडक महाअंतिम फेरी सृष्टी गार्डन डी पी रोड म्हात्रे पुलाजवळ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी शिवशाहीर करंडक विजेत्याचा सन्मान करण्यात आला.छोट्या गटात प्रथम क्रमांक प्रथमेश चव्हाण याचा सत्कार करण्यात आला .

मोठ्या गटात उत्तेजनार्थ मेघा पाटील ,तिसरा क्रमांक इम्रान शेख, द्वितीय क्रमांक आनंद क्षीरसागर तर प्रथम क्रमांक प्रसाद मोरे यांचा देखील सन्मान करण्यात आला .

यावेळी राज ठाकरे म्हणाले की बाबासाहेब पुरंदरे यांचं शंभर वर्षात पदार्पण केल्याबद्दल वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते .या स्पर्धेमागचा उद्देश वक्ते घडविणे असाच आहे. यावेळी त्यांनी आपल्या वक्तृत्वाबद्दल माहिती देताना म्हणाले बाळासाहेब ठाकरे यांनी मला बोलण्याची संधी दिली त्यामुळेचं मी एक चांगला वक्ता झालो आहे .असे राज ठाकरें म्हणाले .सरकार त्याच्या मनात आले की लॉक डाउन लावते .आजच्या कार्यक्रमाला या सरकारने वेड्या सारखे जे नियम लावले आहेत .त्यामुळे खूप लोकांना बोलवता आले नाही.त्यांनी राज्य सरकारला टोला लगावला. विजेत्या वक्त्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रम आयोजित केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच त्यांनी कौतुक केलं. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे,नगरसेविका रुपाली ठोंबरे वपुणे शहर मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News