सुपा मंडल मध्ये महाडीबीटी सोडतीतील निवड झालेल्या लाभार्थी व अधिकारी, कर्मचारी यांचा मार्गदर्शनपर शेतकरी मेळावा संपन्न


सुपा मंडल मध्ये महाडीबीटी सोडतीतील निवड झालेल्या लाभार्थी व अधिकारी, कर्मचारी यांचा मार्गदर्शनपर शेतकरी मेळावा संपन्न

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

बारामती तालुक्यातील सुपे या मंडल मध्ये महाडीबीटी सोडतीत निवड झालेल्या लाभार्थी व अधिकारी, कर्मचारी यांनी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते.


   बारामती तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी यावेळी उपस्थित शेतकरी, अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.या मेळाव्यात कागदपत्र अपलोड करताना येणाऱ्या अडचणी व त्यांच्या शंकांचे निरसन समक्ष उत्पादक विक्रेता व शेतकरी यांच्याशी चर्चा देऊन त्याचे निरसन करण्यात आले. यावेळी बारामती तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, सुपे मंडल कृषी अधिकारी सुभाष बोराटे, इतर कर्मचारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News