राजगुरुनगर येथे PMRDA आरखडा हरकत नोंदवण्यासाठी भाजपा कडुन शेतकरी मार्गदर्शन मेळावा


राजगुरुनगर येथे PMRDA आरखडा हरकत नोंदवण्यासाठी भाजपा कडुन शेतकरी मार्गदर्शन मेळावा

Pune- PMRDA आराखडा फायदे-तोटे जाणून घेण्यासाठी जि. प सदस्य मा. अतुल भाऊ देशमुख व खेड तालुका भाजपा अध्यक्ष शांताराम भोसले यांच्या आयोजनात सर्व खेड राजगुरुनगर चे शेतकरी बांधव उपस्थित होते. संपुर्ण पुणे त्यासह खेड परिसराचा पीएमआरडीए ने विकास आराखडा प्रकाशित केला आहे त्यामध्ये अनेक  गावात चुकीची आरक्षणे टाकण्यात आली आहेत याचे दूरगामी परिणाम त्या शेतकऱ्यांना होणार आहेत. या संदर्भात हरकती घेण्याची मुदत कही दिवसच शिल्लक आहे म्हणूनच सामान्य नागरिकांच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी -


*कायदेशीर मार्गदर्शन तज्ञ वकील मार्गदर्शन करण्यासाठी  भाजपा कायदा आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष ॲड संजय सावंत पाटील, खेड तालुका अध्यक्ष कायदा आघाडी प्रदीप उमाप, ॲड प्रिंतम शिंदे उपस्थित होते* 


*काल गुरुवार दिनांक २ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ३ वाजता चांडोली* येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयांमध्ये *विशेष बैठक* आयोजित करण्यात आली होती यामध्ये या क्षेत्रातील तसेच हरकत घेण्याचा विहित नमुन्यातील फॉर्म शेतकर्याना दिला गेला. खेड तालुक्यातील गावातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी या सर्व विषयाची सखोल माहिती कार्यकर्त्यांना दिली गेली.


या मेळाव्याला संबोधन माजी राज्यमंञी बाळाभाऊ भेगडे, भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष गणेशतात्या भेगडे, जि.प. शरद बुट्टेपाटील, जि.प सदस्य अतुलभाऊ  देशमुख या सर्वानी केले.


मा. बाळाभाऊ भेगडे यांनी राज्यशासणाचा प्रखर विरोध करत शेतकऱ्याच्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालणाऱ्या PMRDA च्या, रिंग रोड, बुलेट ट्रेन, मुंबई- हैद्राबाद रेल्वेमार्ग चुकीच्या आराखड्याच्या विरोधात शेतकरी मार्गदर्शक मेळाव्याला चुकीच्या प्रारूप आराखड्या संदर्भांत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 


यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या सर्वांच्या हरकती लिहून घेण्यात आल्या भाजपच्या वतीने पीएमआरडीए च्या विरोधात आमची लीगल टीम तयार असून शेतकऱ्यांच्या न्यायासाठी पाहिजेत ती लढाई लढण्यास आम्ही तयार आहोत.


यावेळी कार्यक्रम उपस्थिती - माजी राज्यमंञी बाळाभाऊ भेगडे, भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष गणेशतात्या भेगडे, खेड तालुका भाजपा अध्यक्ष शांताराम भोसले, जि.प. शरदभाऊ बुट्टेपाटील, जि.प सदस्य अतुलभाऊ देशमुख, भाजपा कायदा आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष ॲड संजय सावंत पाटील, खेड तालुका अध्यक्ष कायदा आघाडी प्रदीप उमाप, खेड सरचिटणीस ॲड प्रिंतम शिंदे, जितेंद्र बोत्रे, दिलीप मेदगे, कैलास गाळव, जिल्हा उपाध्यक्ष राजनभाई परदेशी, देवा गायकवाड, किरण येलवडे, बालासाहेब कहाने, नाना  खांडेभराड, संजय घुंडरे, अजय जगनाडे, सुनील देवकर उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News