पुण्यात विविध ठिकाणी नोकरी महोत्सव करू : गणेश बिडकर


पुण्यात विविध ठिकाणी नोकरी महोत्सव करू : गणेश बिडकर

सुनील माने यांच्या मार्फत आयोजित "नोकरी महोत्सवाचे" उद्घाटन

पुणे ता. 3: भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतो, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तो लोकांपर्यंत पोहचत असतो. याची प्रेरणा आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून मिळत असते. यातूनच प्रेरणा घेऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुनील माने यांनी बेरोजगारांना नोकरी देण्याचा हा कल्पक कार्यक्रम आयोजित केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तरुणांना नोकरी देण्याच्या त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे भविष्यात आम्ही पुणे शहरात सर्वत्र अनुकरण करू. असे आश्वासन पुणे महानगरपालिकेचे सभागृहनेते गणेश बिडकर यांनी दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी पीमपीएमएल चे संचालक प्रकाश ढोरे यांच्या सहयोगाने औंध – बोपोडी भागातील बेरोजगार तरुणांसाठी, बोपोडी येथील डॉ.राधाकृष्णन प्रशाला येथे नोकरी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाचे उद्घाटन पुणे शहराचे सभागृहनेते गणेश बिडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सिद्धार्थ शिरोळे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.एस. के जैन उपस्थित होते. शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, शिवाजीनगर मंडल अध्यक्ष रवींद्र साळेगावकर, आनंद छाजेड, गणेश नाईकरे, रमेश नाईक, वसंत जुणवने, अविनाश सोनवणे बाळासाहेब रानवडे, नितीन बहिरट, अमर देशपांडे, सुप्रीम चौंधे, रेखा चौंधे, सौरभ कुंडलीक, शारदा पूलावळे, चंद्रशेखर जावळे, रफीक दफेदार, असित गांगुर्डे, गणेश स्वामी, सचिन घोरपडे, अंकल राऊत, राजू पिल्ले, सचिन अंकेल्लू, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

या महोत्सवामध्ये एकूण 1860 जणांनी सहभाग घेतला त्यापैकी 519 जणांना आजच नियुक्तिपत्र देण्यात आले. तर 289 उमेदवार दुसऱ्या फेरीस पात्र ठरले.

नोकरी महोत्सवाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना बिडकर म्हणाले, कोरोना महामारीनंतर अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांचे व्यवसाय बुडाले त्यामुळे अनेकांनी त्यांच्याकडील कामगार कमी केले. अशा परिस्थितीमध्ये नोकरी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. हाच प्रश्न सोडवण्यासाठी सुनील माने यांनी आयोजित केलेला हा उपक्रम अतिशय अभिमानास्पद आहे.  

आमदार शिरोळे म्हणाले, कोविड नंतर जगाच्या तसेच देशाच्या अर्थचक्राला थोडी मरगळ आली आहे. ही मरगळ दूर करण्यासाठी मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त हा नोकरी महोत्सव आयोजित केला आहे हे खरे तर राष्ट्रनिर्माणाचे काम आहे. या नोकरी महोत्सवामध्ये प्रत्येकाच्या आवडी – निवडीनुसार नोकरी मिळत आहे हे  वैशिष्ठ म्हणावे लागेल. भविष्यात काम करण्यास इच्छुक असणाऱ्या महिला तसेच तरूणांसाठी एखादे ॲप विकसित करून त्यांना स्वयंभू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु.   

तरूणांनो उद्योजक व्हा...

कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, अशा परिस्थिती मध्ये सुनील माने यांच्या वतीने आयोजित केलेल्या नोकरी महोत्सव हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. या नोकरी महोत्सवामधून बहुतांश जणांचे प्रश्न सुटतील मात्र ज्यांना या महोत्सवामधून नोकरी मिळणार नाही त्यांनी नउमेद न होता उद्योजक होऊन नोकऱ्या देण्याचे स्वप्न पहावे. नोकऱ्यांबरोबरच स्वयंरोजगारासाठी पंतप्रधान मोदी यांनी अनेक योजना आणल्या आहेत. या पुढील काळात स्वयंरोजगाराचेही प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शिबिर आयोजित करावे असे आवाहन ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. एस. के जैन यांनी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News