सौ.काकडे यांच्यात गरिबांचे प्रश्न सोडण्याची क्षमता आहे -चौधरी.


सौ.काकडे यांच्यात गरिबांचे प्रश्न सोडण्याची क्षमता आहे -चौधरी.

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण : तालुक्यातील गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडण्याची प्रचंड इच्छाशक्ती काकडे कुटुंबात दिसते. गोरगरीबांचे प्रश्न सोडवण्याची क्षमता त्यांच्यात निश्चित आहे असे मला वाटते. परमेश्वराने त्यांना बळ द्यावे असे प्रतिपादन रोटरी क्लब शेवगावचे अध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांनी शेवगाव येथे केले. 

जनशक्ती श्रमिक संघ शेवगाव-पाथर्डी यांच्या प्रयत्नातून असंघटित बांधकाम कामगारांना सुरक्षा संच किटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास जगन्नाथ गावडे, राजू खेडकर, रमेश भालसिंग, काकासाहेब दळे, जालिंदर कापसे, आप्पासाहेब मडके, बबनराव पवार, लक्ष्मण पातकळ, कॉ.राम पोटफोडे, जनशक्तीचे शहराध्यक्ष सुनील काकडे इ. प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये १४५ कामगारांना बांधकाम सुरक्षा संच वाटप करण्यात आले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरुन बोलताना चौधरी म्हणाले की, आज समाजामध्ये गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी कामगार यांच्या प्रश्नाकडे स्वतःला मोठे म्हणणारे लोकांकडून दुर्लक्ष होत आहे. आज मी काकडे दांपत्याचे कार्य पाहात आहे. दिन दलित गरीब लोकांसाठी त्यांची धडपड मी पहात आहे असे चौधरी यावेळी बोलताना म्हणाले.

शंकर देवडे म्हणाले की, आज तालुक्यामध्ये गोरगरिबांचा वाली म्हणून अॅड.शिवाजीराव काकडे पुढे येत आहेत याचा अभिमान वाटतो. कारण त्यांना त्यांचे वडील कै.आबासाहेबांचा वारसा आहे व त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ते आज गरिबांसाठी काम करत आहेत.

 कार्यक्रमास विनोद पवार, विष्णू दिवटे, महेंद्र मेरड, भारत लांडे, सुधाकर आल्हाट, आबासाहेब वाघ, शशिकांत काकडे, संभाजी टाकळकर, देवदान आल्हाट यांच्यासह अनेक बांधकाम कामगारांची उपस्थिती होती. कोविड नियमांचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सोपानराव पूरनाळे यांनी तर सूत्रसंचालन संजय दुधाडे यांनी व आभार दुर्गाजी रसाळ यांनी मानले. यावेळी जगन्नाथ गावडे, रमेश भालसिंग यांची भाषणे झाली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News