श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य उरण, सामाजिक कार्यात महाराष्ट्रात अग्रेसर


श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य उरण, सामाजिक कार्यात महाराष्ट्रात अग्रेसर

नैसर्गिक आपत्तीकाळ मध्ये मदत करणाऱ्या मान्यवरांचा संस्थेकडून सत्कार सोहळाशिर्डी,राजेंद्र दूनबळे: श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य उरण या संस्थेच्या वतीने मुंबई येथील नुकत्याच झालेल्या  आपत्ती   मुळे जनजीवन विस्कळीत झाले होते,अनेकांना  रोजी रोटी चा प्रश्न निर्माण झाला होता तसेच अनेक प्रपंच उघड्यावर पडले असतांना उरण येथील सामाजिक संस्थेच्या वतीने मदतीसाठी अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते ,यांना मदतीचे आवाहन केले होते ,अनेक लोकांनी मदती साठी पुढे आले, याच सामाजिक कार्यकर्ते ,मित्र परिवाराचा,मान्यवरांचा सत्कार  संस्थेच्या वतीने करण्यात आला म्हणून             

 २९/०८/२०२१_ रोजी कृतज्ञता दिवस म्हणुन साजरा करण्यात आला . खरं तर ज्या ज्या मान्यवरांनी आपल्या संस्थेला आर्थिक असो वा वस्तू रूपी , श्रमदानातून सुद्धा मदत केली. जेवढे समाजकार्य आपल्या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आले ते सर्व कार्य १००% यशस्वी पणे पार पडले .ते शैक्षणिक किंवा सामाजिक असो . कुठलीही अपेक्षा न बाळगता ज्यांनी ज्यांनी संस्थेला पाठिंबा दिला अश्या मान्यवरांचा सत्कार म्हणून कृतज्ञता दिवस कार्यक्रम राबविण्यात आला . या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राजू मुंबईकर साहेब तसेच कार्यक्रमाला उपस्थिती  आदरणीय संघटनेचे सल्लागार सुधीर मुंबईकर सर संघटनेचे एडवोकेट गुरुनाथ भगत सर ,महेश पाटील (भाई) ,ह.भ.प. चंदन महाराज , शशी पाटिल, विकी भाऊ पाटील ,स्वप्नील म्हात्रे, पत्रकार पंकज ठाकूर,आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाची प्रास्ताविका श्री. सुधीर मुंबईकर सर यांनी मांडली व सूत्रसंचालन सूनील वर्तक , जीवन डाकी यांनी शुद्ध आणि निशब्द केले असून ,संघटनेचे अध्यक्ष सुदेश पाटील यांनी सर्व शिवभक्त व मान्यवराचे आभार व्यक्त केले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News