सायंबाचीवाडीचे उपसरपंच प्रमोद जगताप यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर


सायंबाचीवाडीचे उपसरपंच प्रमोद जगताप यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

सायंबाचीवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रमोद दिलीपराव जगताप यांच्या विरोधातील अविश्वासाचा ठराव चार विरुद्ध शून्य ने मंजूर करण्यात आला.

   दि.०१ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ३.०० वा. अध्यासी अधिकारी तथा प्रभारी तहसीलदार महादेव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेत हा ठराव घेण्यात आला.

    ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणे तसेच मनमानी कारभार करणे आदी कारणास्तव सायंबाचीवाडीचे सरपंच हनुमंत किसन भगत, सदस्य गणेश विश्वास भापकर, शीतल नारायण भापकर आणि शारदा शांताराम भापकर यांनी याबाबत बारामतीचे तहसीलदार यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. 

   वरील सदस्यांनी उपसरपंच प्रमोद दिलीपराव जगताप यांचे विरुद्ध अविश्वास ठराव मांडला. सदर ठरावाला गणेश विश्वास भापकर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सदर ठराव चर्चेला ठेवण्यात आला. 

    यावेळी उपसरपंच प्रमोद जगताप हे अनुपस्थित असल्याने विश्वास ठरावाबाबत हात वर करून मतदान घेण्यात येईल असे अध्यासी अधिकारी तहसीलदार यांनी सांगितले. सर्वप्रथम ठरावाच्या बाजूने ज्यांना मतदान करायचे आहे त्यांनी उजवा हात वर करावा असे अध्यासी अधिकारी यांनी सांगितले असता सरपंच हनुमंत भगत, सदस्य गणेश भापकर, शारदा भापकर, शीतल भापकर या सदस्यांनी आपला उजवा हात वर करून ठरावाच्या बाजूने मतदान केले. 

  ग्रामपंचायत सायंबाचीवाडी सदस्यांची एकूण संख्या ७ असून यापूर्वी एक सदस्याने आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे ती जागा रिक्त आहे.  सध्या सदस्य संख्या सहा आहे. यापैकी उपसरपंच प्रमोद जगताप व एक सदस्य या सभेदरम्यान उपस्थित नव्हते.

       चारही सदस्यांनी उपस्थित ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने ग्रामपंचायत सायंबाचीवाडी येथील उपसरपंच प्रमोद दिलीपराव जगताप यांच्यावरील अविश्वास ठराव बहुमताने संमत झाला असे अध्यासी अधिकारी यांनी जाहीर केले. उपस्थित सर्व सदस्यांचे आभार मानून सभेचे कामकाज संपल्याचे जाहीर करण्यात आले.

   राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, पंचायत समिती सदस्य राहुल भापकर, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर व नगरसेवक दुर्योधन भापकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन गावातील विकासकामे करू असे मत सरपंच भगत यांनी यावेळी व्यक्त केले.

     यावेळी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान नगरसेवक दुर्योधन भापकर, पोलिस पाटील गोविंद जगताप, नारायण भापकर, मनोहर भापकर, ऋषिकेश भापकर, महेंद्र खंडाळे, भाऊसाहेब जाधव, तानाजी भापकर, सतीश यादव, ग्रामसेवक अजित जाधव आदी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News