सणांची परंपरा खंडीत करू नका, परंतू कोरोनामुळे शासनाच्या नियमांचे पालन करून सणउत्सव साजरे करा-- DYSP राहूल धस


सणांची परंपरा खंडीत करू नका, परंतू कोरोनामुळे शासनाच्या नियमांचे पालन करून सणउत्सव साजरे करा-- DYSP राहूल धस

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

कोरोना महामारी मुळे सण उत्सव यांच्या वर मर्यादा निर्बंध आले आहेत, त्यामुळे शासनाकडून आलेल्या सर्व नियमांचे पालन करून सण साजरे करण्याचे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी राहूल धस यांची शांतता कमिटीच्या मिटिंगमध्ये आलेल्या मान्यवरांना केले आहे, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी शांतता कमिटीची मिटिंग आयोजीत केली होती, यावेळी दौंड पोलीस उपविभागीय अधिकारी राहूल धस आणि नगराध्यक्षा शितल कटारिया यांचा पुष्पगुच्छ देऊन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सत्कार केला,पो नि घुगे यांचा सत्कार नगरसेविका अरुणा डहाळे यांनी केला,यावेळी पो नि विनोद घुगे यांनी सांगितले की कोरोना अजून संपलेला नाही त्यामुळे स्वतःची आणि कुटुंबाची सर्वांनी काळजी घ्यायची आहे,गणेशोत्सव साजरा करताना काही निर्बंध आहेत त्याचे सर्वांनी पालन करायचे आहे, त्यामध्ये रस्त्यावर  छोटा मंडप उभा करायचा आहे, गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाची 4 फुटाच्या आत असावी,घरगुती मूर्ती दोन फुटाच्या आत असाव्यात,आबा वाघमारे यांनी गोलराऊंड ते कुरकुंभ मोरी दरम्यानच्या रस्त्याची झालेली दुरवस्था सांगितली,गणपती पूर्वी रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी नगराध्यक्षा यांचेकडे मागणी केली, तसेच मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी, लाईट बोर्डाचे अधिकारी यांची उपस्थिती आवश्यक होती हेही निदर्शनास आणून दिले, नागसेन धेंडे म्हणाले सण साजरे करताना जनतेने कोरोना महामारीचा विचार करून सण साजरे करावेत,बी वाय जगताप यांनी बुद्धांचे विचार सांगितले की तुम्ही स्वतःचे रक्षण करा इतरांचे रक्षण आपोआप होईल,भारत सरोदे म्हणाले सण आले की कोरोना येतोय दोन वर्षे झाली हेच चाललंय,ज्यांनी दोन डोस कोरोना लस घेतली आहे त्यांनाच परवानगी द्या असे मत व्यक्त केले, भीमराव मोरे यांनी गणपती मंडळाचे अध्यक्ष च मिटींगला उपस्थित रहात नाहीत अशी खंत व्यक्त केली,अमोल काळे यांनी सांगितले की आम्ही कोरोना काळात कामही केले आणि सहकार्य केले, यावर्षीही आमचे शासनाला सहकार्य राहील यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी राहूल धस यांनी सर्व मान्यवरांना सूचना केल्या की कोरोना मुळे यावर्षी सुद्धा सण साधेपणा ने साजरे करावेत,गणपती बाप्पाचे आगमन आणि विसर्जन मिरवणुक काढता येणार नाहीत, आम्ही नगरपालिका, आरोग्य अधिकारी, आणि महावितरण यांची बैठक घेऊ आणि प्रत्येक वार्डनिहाय नगरसेवकांनी आपल्या परिसरात कृत्रिम हौद घेऊन मूर्ती विसर्जन करण्याची सोय उपलब्ध करून द्यायची आहे,शेजारी स्वच्छ टेबल ठेवून त्यातील मूर्ती बाहेर काढून त्यावर ठेवायच्या आहेत,आणि नंतर नगरपालिके मार्फत ते नदी पात्रात विसर्जित केल्या जातील यासाठी सर्वच मंडळाचे अध्यक्ष यांनी सहकार्य करण्याचे आवाहन राहुल धस यांनी यावेळी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार गोपाळवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल होले यांनी मानले,यावेळी दौंड मधील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News