कोपरगाव मतदार संघातील दिव्यांगांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी यांनी दिली मोफत बससेवा


कोपरगाव मतदार संघातील दिव्यांगांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी यांनी दिली मोफत बससेवा

कोपरगाव प्रतिनिधी /राजेंद्र तासकर

कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग बंधु भगिनींना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ  मिळावा, स्वकर्तुत्वावर उभे राहुन स्वयंरोजगार निर्मित करता यावे, समाजामध्ये त्यांच्या प्रती प्रेम, जिव्हाळा , आदरभाव निर्माण व्हावा, स्वतःच्या समस्याचा सामना स्वतः करता यावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सुतोवाच युनिक आयडी कार्ड वाटपाच्या मेळाव्या प्रसंगी मा.आमदार आशुतोषदादा  काळे यांनी केले होते.

             दिव्यांगांना दिलेल्या आश्वासनाची प्रतिपूर्ती म्हणुन जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे तपासणी करून सर्टिफिकेट मिळावे व त्यांना शासनाचे विविध प्रकारच्या योजनांचा  लाभ घेता यावा, त्यांचे जीवन सुखकर व समाधानी व्हावे म्हणुन मा.आमदार श्री.आशुतोष दादा काळे यांच्या सहकार्यातुन  कोपरगाव येथुन मोफत बससेवा देण्यात आली होती. मोफत देण्यात आलेल्या वाहनांना श्री छ्त्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ झेंडा दाखून रवाना करण्यात आले होते.

यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद, फकिरमामु कुरेशी, रमेश गवळी, बाळासाहेब रुईकर, इम्तियाज अत्तार, धनंजय कहार, राहुल जगधने, मनोहर कृष्णानी, योगेश गंगवाल, प्रकाश मोराडे, परमेश्वर कराळे आदी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News