अखेर शिर्डी साईबाबा संस्थानचा मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रश्न लागला मार्गी !


अखेर शिर्डी साईबाबा संस्थानचा मुख्य  कार्यकारी अधिकारी पदाचा प्रश्न लागला मार्गी !

कोपरगाव प्रतिनिधी / राजेंन्द्र तासकर

     संपूर्ण जगामध्ये ख्याती असलेले महाराष्ट्रतील शिर्डी साईबाबा  संस्थानचा नाव लौकिक आहे. साईबाबा संस्थान समीतीची निवड योग्य नसल्याची तक्रार कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी न्यायालयात दाखल केली होती.

       साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल न केल्याप्रकरणी व मंदिराच्या सीसीटीव्ही फुटेजचा गैरवापर करून तसेच समितीच्या अध्यक्ष व सहस्य विरुद्ध कटकारस्थान व बदनामी केल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी मा. उच्च न्यायालयाची पोलिस प्रशासनाला नोटिस देण्यात आली होती.

     मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कान्हुराज बगाटे साईबाबा संस्थान, शिर्डी हे तदर्थ समितीला सुरळीत काम करण्यास आडकाठी आणतं असल्याचा अहवाल वेळोवेळी मा.अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश, अहमदनगर यांनी मा. उच्च न्यायालयात सादर केलेले आहेत तसेच त्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती नियमाला धरून नसल्यामुळे सनदी IAS अधिकारी नेमावा. अशा अनेक विषयवार तक्रारी राज्य शासनाकडे केल्या होत्या . सदर तक्रारींवर चौकशी देखील चालू आहे.त्याची सुनावणी ४ ऑक्टोबर २०२१रोजी ठेवण्यात आलीआहे.त्या अगोदरच सीईओ पदाची जबाबदारी नागपूरहुन रेशीम उद्योग विभागाच्या संचालक भाग्यश्री बानाईत-धिवरे यांच्याकडे सोपवण्यात आल्याने शिर्डीच्या विकासाचे मार्ग खुले झाल्याचे व आपल्या न्यायालयीन लढयाला यश आल्याचे  सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News