अभिमानाने आणि आनंदाने,आज आपल्या तमाम भारतवासियांची, *भारतीय आयुर्विमा महामंडळ* ही संस्था ६५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. संस्थेचे ब्रीदवाक्य *योगक्षेमं वहाम्यहम्* म्हणजेच तुमची सुरक्षितता ही आमची जबाबदारी.

*भारतीय आयुर्विमा महामंडळ* 

१ सप्टेंबर १९५६ या दिवशी भारतीय आयुर्विमा महामंडळाची स्थापना झाली आणि  हे ब्रीदवाक्य घेऊन १ सप्टेंबर २०२१ पर्यंत व पुढे या वाक्याची पूर्तता करण्यामध्ये कुठल्याही प्रकारची कसूर न ठेवता, अविरत भारतीय लोकांच्या सेवेत अग्रेसर, अखंडपणे चालू आहे, राहणार.

एलआयसी काळानुरूप, ग्राहकांच्या गरजा नुसार बदलत गेली, नवीन संगणकीय बदल स्वीकारत गेली त्यामुळेच LIC ची प्रगती झाली आणि भारतीय लोकांच्या विश्वासाला सदैव पहिल्या क्रमांक वर पात्र राहिली.

आजच्या या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त असंख्य विमेदारांचे आभार मानून, आपली ही संस्था अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहो, राष्ट्र उभारणी मध्ये मोलाचे योगदान राहो व यशाचा हा झेंडा असाच उंच उंच अनंत  आणि निरंतर  फडकत राहो.

सर्व ग्राहकवृंद, विकास वाहिनी चे अधिकारीवर्ग, विमा प्रतिनिधी, कर्मचारी गण, आपणास सर्वाना ६५ व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News