ओळखपञ असणाऱ्या पञकारांना मंञालयात प्राधन्याने प्रवेश मिळावा; नितीन जाधव राज्य मराठी पञकार संघाचे नितीन जाधव यांचे गृहमंत्र्यांना निवेदन


ओळखपञ असणाऱ्या पञकारांना मंञालयात प्राधन्याने प्रवेश मिळावा; नितीन जाधव राज्य मराठी पञकार संघाचे नितीन जाधव यांचे गृहमंत्र्यांना निवेदन

मुंबई प्रतिनिधी : मागील दीड वर्षापासून कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून शासनाने अनेक कडक निर्बंध तयार केले होते पण सध्या कोरोना परिस्थिती नियंञणात येत आहे. मंञालयीन वार्तांकन करणाऱ्या तसेच दैनिकांचे प्रतिनिधी असणाऱ्या पञकारांना मंञालायात प्रवेश नाकारला जात आहे .अनेक वेळा वार्ताहर ,पञकार काही महत्त्वाच्या घडामोडीचे वार्तांकन करण्यासाठी मंञालयात ये जा करत असतात. परंतु सध्या मंञालयीन सुरक्षारक्षका कडून पञकारांची प्रवेशद्वारावर अडवणूक होत आहे.तसेच बर्याचदा पञकारांबरोबर अरेरावी केली जात आहे, त्यामुळे समाज घङवण्याचे, जनतेच्या प्रश्नांची बातम्याच्या  माध्यमातून सोडवणूक करणाऱ्या पञकारांमध्ये   नाराजी पसरत   आहे .मंञालयात घङणार्या घङामोडी ,सामाजिक ,राजकीय ,कृषी,शैक्षणिक ,उद्योजकीय ,बातम्या तसेच जनसामान्याच्या जीवनाशी जोडलेले महत्त्वाचे वृत्त संबंधी माहीती मिळविण्यासाठी अङचण ठरत आहे.

सदरचा विषय गृहमंत्री  महोदय दिलीप वळसेपाटील यांना मुद्देसुद  सांगितला असून ,दैनिकाचे तसेच महा.राज्य मराठी पञकार संघाचे  ओळखपञ असणार्या  पञकारांना,पदाधिकार्यांना  प्राधान्याने प्रवेश देणे संबंधी निवेदन दिले आहे. मागील दीड वर्षापासून दैनिकाचे  प्रतिनिधी ,वार्ताहर ,पञकार संघाचे मुख्य पदाधिकारी यांना ओळखपञावर  मंञालय प्रवेश नाकारला जात असून पञकारांची अङवणूक होत आहे तसेच गृहमंत्री महोदयांनी संबंधित पोलीस विभागाला ओळखपञ दाखवून प्रवेश मिळण्याची मूभा असावी असा आदेश द्यावा  अशी विनंती निवेदनात करण्यात आलेली आहे.

तसेच गृहमंत्री वळसेपाटील यांनी दैनिकांचे पञकार ,वार्ताहर,तसेच मंञालयीन पञकार संघाचे पदाधिकारी यांच्या प्रवेशासाठी सकारात्मकता दाखवली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News