शेवगांव पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्याची स्वाभिमानीची मागणी दत्तात्रय फुंदे


शेवगांव पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्याची स्वाभिमानीची मागणी दत्तात्रय फुंदे

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

अचानक आलेल्या पूरमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत

शेवगांव-पाथर्डी तालुक्यातील डोंगर माथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदणी,चांदणी,भागीरथी  व ढोरा नदीला पूर आल्याने तालुक्यातील वरूर,भगूर,आखेगाव, खरडगाव, वडुले बुद्रुक ,जोहारापूर,ठाकूर पिंपळगाव  या गावात नदीपात्र सोडून पाणी घर व शेतीत घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून सुमारे १०० पेक्षा जास्त जाणावरे  आनेक शेळ्या गाई म्हशी कोंबड्या वाहून गेली असून कच्च्या घरांची पडझड झाली आहे तर उस,कापूस,सोयाबीन,तूर,मुग या उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले.अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे नदी काठचे रहिवासी व शेतकरी भीती व चिंतेच्या सावटाखाली आहेत. शेवगाव पाथर्डी तालुक्यात सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पावसास सुरुवात झाली,येथे दमदार पाउस झाल्याने पाथर्डी तालुक्यातील डोंगर माथ्यावर अतिवृष्टी झाली व त्याचे पाणी तालुक्यातील नांदणी,चांदणी,भागीरथी  व ढोरा या नद्यांना आले या जोरदार पाण्याने मंगळवारी पहाटेच्या सुमारास नदीपात्र सोडून हे पाणी वरूर,भगूर,आखेगाव,खरडगाव या गावात घर व शेतात घुसल्याने नागरिकांची धावपळ झाली,अनेकजणांनी  घराच्या गच्चीवर आसरा घेणे पसंद केले. या पाण्यात आखेगाव येथील २५ कुटुंब तर वरूर  येथील काही कुटुंबे पाण्यात अडकले आहेत, .वडुले बु येथे नदीकाठी असलेल्या मागासवर्गीय व मुस्लीम वस्तीवरील घरात पाणी शिरल्याने तेथेही नुकसान झाले आहे.या परिस्थितीत नागरिकांच्या घरांमध्ये काहीही शिल्लक न राहिल्यामुळे तातडीने आर्थिक मदत देण्याची आवश्यकता आहे    व पंचनामे होण्यापूर्वी हेक्टरी 50 हजार रुपयाची आर्थिक मदत तातडीने देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी केली आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News