इनरव्हील क्लब ऑफ शेवगाव सिटीतर्फे उचल फाऊंडेशनच्या वसतीगृहात श्रीकृष्ण जयंती व गोपालकाला निमित्ताने पुस्तक दहीहंडी हा अनोखा उपक्रम राबवून अनाथ मुलांच्या चेह-यावर हास्य फुलवले.


इनरव्हील क्लब ऑफ शेवगाव सिटीतर्फे उचल फाऊंडेशनच्या वसतीगृहात  श्रीकृष्ण जयंती व गोपालकाला निमित्ताने पुस्तक दहीहंडी हा अनोखा उपक्रम राबवून अनाथ मुलांच्या चेह-यावर हास्य फुलवले.

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा डॉ. मनिषा लड्डा यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. मनिषा लड्डा व  माजी अध्यक्षा रूपाली तडवळकर यांनी अनाथ मुलांना वाचनीय पु्स्तक रूपी भेट दिली. तसेच अनाथ विद्यार्थ्यांशी इनरव्हीलच्या सदस्या महिलांनी सहजपणे मनमोकळा संवाद साधला. डॉ. लड्डा यांनी स्वतः बनवून आणलेला खाऊ अर्थात गोपालकाला मुलांना खाऊ घातला. योगिता पाटील यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून अनाथ मुलांसाठी दोन हजार शंभर रूपयांची अर्थिक मदत केली. या वेळी बोलताना डॉ. मनिषा लड्डा म्हणाल्या की, इनरव्हील क्लब परिवार यांनी कायमच सामाजिक भान जपत आपले वेगळेपण वेळोवेळी दाखवून दिले आहे.  ज्यात कोरोना रुग्णांना तसेच चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी केलेली मदत, झोपडपट्टीतील मुलांना शैक्षणिक साहित्य रुपी केलेली मदत, विधवा व परित्यक्ता यांना व्यवसाय प्रशिक्षण देणे, इत्यादी उपक्रम इनरव्हील परिवार सातत्याने राबवत आला आहे. खरतर गोपाळकाला आणि दहीहंडी उत्सव हे खूप महत्वाचे सण आहेत.  पण महाराष्ट्रासह देशभरात उत्साहात साजरा होणारा हा कार्यक्रम यावर्षी मात्र कोविड मुळे यात विरजण पडले. आणि या उत्सवावर अनेक निर्बंध लादले गेले. पण नेहमीप्रमाणेच इनरव्हील परिवाराने यातही थोडी कल्पकता वापरून पुस्तकांची दहीहंडी हा आगळा वेगळा उपक्रम उचल फाऊंडेशन येथे आयोजित केला. या वेळी राजश्री रसाळ यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी इनरव्हील क्बलतर्फे अनाथ मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन सविता रेड्डी यांनी केले. तर आभार वसुधा सावरकर यांनी केले.


- - इनरव्हील क्लब ऑफ शेवगाव सिटीतर्फे उचल फाऊंडेशनच्या येथील  वसतीगृहात पुस्तकांची दहीहंडी हा आगळा वेगळा उपक्रम  राबवून श्रीकृष्ण जयंती व गोपालकाला निमित्ताने  अनाथ मुलांच्या चेह-यावर हास्य फुलवले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News