डॉ.तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी थकीत पगार प्रश्नी आंदोलन दहाव्या दिवशी..कारखान्याशी संलग्न संस्थानवर कामगारांनी मोर्चा


डॉ.तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी थकीत पगार प्रश्नी आंदोलन दहाव्या दिवशी..कारखान्याशी संलग्न संस्थानवर कामगारांनी मोर्चा

राहुरी फॅक्टरी

महाराष्ट्रभुमी प्रतिनिधी- विजय एस भोसले

राहुरी येथील डॉ.तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी थकीत पगार प्रश्नी सुरू केलेले आंदोलन दहाव्या दिवशी सुरू असून कारखान्याशी संलग्न संस्थानवर कामगारांनी मोर्चा काढून प्रमुख पदावर कार्यरत असलेले  प्रवरेचे आयात कर्मचारी यांना "चले जावं" चा नारा देऊन आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.


                        डाँ.तनपुरे कारखान्याकडे कामगारांची थकीत देणी मिळविण्यासाठी कामगारांनी गेल्या दहा दिवसा पासुन आंदोलन सुरु केले आहे.गेल्या तीन चार दिवसात खा.विखे, संचालक मंडळ यांनी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले.परंतू लेखी प्रस्तावात ठोस असा थकीत देय देण्याबाबत कालावधी निश्चित नसल्याने कामगारांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला.

आंदोलनाच्या दहाव्या दिवशी आंदोलक कामगारांनी कारखान्याच्या संलग्न संस्थेवर मोर्चा नेत  प्रवरेचे आयात कामगार व अधिकारी यांनी कामावर येवू नये, आल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

 आंदोलक कामगारांनी विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, लक्ष्मीनारायण औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पेट्रोल पंप  आदी ठिकाणी जाऊन प्रवरेचे आयात  अधिकारी व कर्मचारी यांना चले जावंचा इशारा दिला आहे. आम्ही उपाशी अन  ते तुपाशी अशी  परिस्थिती असून  राहुरी कामधेनू मोकळी करा अन्यथा उद्या पासुन तीव्र आंदोलन छेडु असा इशारा  इंद्रभान पेरणे यांनी दिला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News