कर्जत वकील संघाच्या अध्यक्षपद निवडणुकीत ॲड. धनराज राणे विजयी


कर्जत वकील संघाच्या अध्यक्षपद निवडणुकीत ॲड. धनराज राणे विजयी

कर्जत प्रतिनिधी (मोतीराम शिंदे) - कर्जत तालुका वकील संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. धनराज राणे, उपाध्यक्षपदी ॲड. सचिन रेणुकर तर सचिवपदी ॲड. संजीवन गायकवाड यांचा  विजय झाला.

         मागील दोन वर्षापूर्वी पहिल्यांदा कर्जत तालुका वकील संघाची  निवडणूक झाली होती. यावर्षी कार्यकाळ संपल्याने नुकताच निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. गोपाळराव कापसे व अँड. अनुभुले यांनी निवडणुकीचा संपूर्ण प्रोग्राम जाहीर केला होता. निवडणुकीमध्ये एकूण तीन पॅनल झाले, त्यापैकी ज्येष्ठ ॲड. रवींद्रनाथ भोसले, ॲड. भिमराव शेळके व ॲड. बाळासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विशेष आघाडी घेत यापूर्वीच महिला सचिव अँड. सुनिता बागल, खजिनदार अँड. विनायक जाधव व ग्रंथालय सचिव अँड. प्रविण पवार यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर निवडणूकीतून प्रचारामध्ये विशेष आघाडी घेत अध्यक्षपदासाठी अँड. धनराज राणे यांनी प्रतिस्पर्धी अँड. संदीप धोदाड व अँड. हरिचंद्र महामुनी यांचा मोठया मतांच्या फरकाने पराभव करत विजय प्राप्त केला. उपाध्यक्षपदीही याच पॅनलचे अँड. सचिन रेणूकर विजयी झाले. मात्र प्रतिस्पर्धी पॅनलचे सचिव पदाचे उमेदवार अँड. संजीवन गायकवाड यांचा अवघ्या एका मताने विजय झाला. अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर अँड. धनराज राणे यांनी बोलताना, कर्जत वकील संघात सर्व वकीलांना सोबत घेवून काम करताना, वकीलांचे व वकील संघाचे हिताचे व विकासाचे सर्व प्रश्न सोडवण्याची खात्री दिली. तसेच कर्जत येथे कर्जत व जामखेड या दोन तालुक्यासाठी मंजूर असलेले वरिष्ठ स्तर  दिवाणी न्यायालय लवकर सुरु करण्यासाठी विशेष लक्ष देवून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय कर्जत येथे आणण्यासाठीही प्रभावी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली आहे.

निवडणूक योग्य रितीने पार पडण्यासाठी अँड. दिपक भंडारी, अँड. नामदेव खरात, अँड. सुरेश वाकडे, अँड. नवनाथ फोंडे, अँड. विठ्ठ्लराव गवारे, अँड. युवराज राजेभोसले, अँड. दिपक भोसले, अँड.राहुल जाधव, अँड. गजेंद्र बागल, अँड. अनिल म्हेत्रे, अँड. संग्राम ढेरे, अँड. नितीन जगताप, अँड. आनंद साळवे, अँड. भालचंद्र पिसे, अँड. संजय गवारे, अँड. रामदास पुराणे, अँड. अशोक कोठारी, अँड. प्रतिभा रेणूकर आदींनी खूप प्रयत्न केले.

निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आमदार रोहीतदादा पवार, खासदार सुजयदादा विखे पाटील, माजी मंत्री राम शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, बळीराम आण्णा यादव, अशोकराव खेडकर, प्रवीणदादा घुले, उदयोजक दिपकशेठ शिंदे, सरपंच विजय तोरडमल, सुनील शेलार, प्रसाद ढोकरीकर, कॉन्ट्रक्टर देवकर सर, सुधीर यादव, पै. दिपक काळे, पै. प्रसाद कानगुडे, नितीन तोरडमल, किरण पाटील यांनी अभिनंदन केले. 

अध्यक्षपदी अँड. राणे विजयी झाल्यानंतर बहिरोबावाडी येथील युवकांनी जल्लोषात फटाक्यांची आतषबाजी करत विशेष आनंद व्यक्त करुन, सोशल मिडीयावरही शुभेच्छांचा वर्षाव केला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News