जिज्ञासा आयोजित "आयुर्संभाषा" राष्ट्रीय परिषद पुणे शहरात संपन्न.


जिज्ञासा आयोजित "आयुर्संभाषा" राष्ट्रीय परिषद पुणे शहरात संपन्न.

जिज्ञासा महाराष्ट्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने "आयुर्संभाषा" ही राष्ट्रीय स्तरावरिल परिषद 30 ऑगस्ट 2021, सोमवार रोजी ज्ञानेश्वर सभागृह, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे संपन्न झाली. याचे  जिज्ञासा महाराष्ट्र यांच्या युट्युब चॅनेल वर थेट प्रसारण करण्यात आले. या परिषदचे आयोजन प्रत्यक्ष व ऑनलाइन या दोन्ही स्वरूपात सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:00 या वेळेत करण्यात आले होतें. या एकदिवसीय परिषदेचे एकूण 4 सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले होते. 

परिषदेच्या उद्घाटन समारंभात  वैद्य सुमित गोयल अाे.एस.डी टू सेक्रेटरी ऑफ आयुष ; प्रो. डॉ.नितीन करमळकर कुलगुरू सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठ व महारष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,प्रो. डॉ भूषण पटवर्धन, नॅशनल रिसर्च प्रोफेसर, आयुष हे मान्यवर उपस्थित होते.

या समारंभाचे आभार प्रदर्शन वै. ऋतुजा जाधव , जिज्ञासा महाराष्ट्र  संयोजक यांनि केले. वै. विनिथ मोहन जिज्ञासा राष्ट्रीय संयोजक यांनी याचे प्रस्तावन केले. या परिषदेत एकूण ४ सत्रांचे आयोजन करण्यात आले. पहिला सत्र प्रिवेंटिव सत्र असा होता.  या सत्रात वैद्य ज्योत्स्ना पेठकर (परिवर्तन आयुर्वेद हॉस्पिटल), डॉ. शिवकुमार हरती (All India Institute of Ayurveda) व डॉ. अमित राय (Reasearch offiver,CCRAS) हे वक्ते होते. दुसरा सत्र रिसर्च या बद्दल होता. यात वैद्य पंकज वंजारखेडकर (दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल) , वैद्य सुप्रिया भालेराव (IRSHA, भारती विद्यापीठ) व वैद्य राममनोहर (Amrita School of Ayurveda) हे प्रमुख वक्ता होते . तिसरा सत्र हा क्युरेटिव्ह सत्र होता. यात वैद्य परीक्षित शेवडे(श्री व्यंकटेश आयुर्वेद) वैद्य विवेक सावंत, वैद्य ज्योती जोशी , वैद्य संदीप जाधव व वैद्य पी.यल.टी गिरीजा या प्रमुख वक्ता होत्या. या सत्रात या वैद्यांनी आप आपले अनुभव व चिकीत्सा पद्धती बद्दल व्याख्यान दिले. शेवटच्या सत्रात आयुर्वेदाची व्यापती वाढवणे या विषयावर खुली चर्चा झाली. यात वैद्य ज्योती मुंदरगी, वैद्य लक्ष्मण लावगणकार, वैद्य गिरीश सरडे, वैद्य निलेश लोंढे अशे उत्तम वैद्य लाभले. या सत्राचे संचालन वैद्य मिहीर वाचसुंदर यांनी केलं. या नंतर निर्णायक सत्रात वैद्य सुकुमार सरदेशमुख व वैद्य विनोद कुमार यांनी आपले अनुभव संगळ्यां पुढे मांडले व सर्व विद्यार्थींना व तेथे उपस्थित सर्व वैद्यांना आयुर्वेद शास्त्राच्या मूळ सुद्धांतांना पकडून,पुढे नेण्यासाठी प्रेरीत केले. या संपूर्ण परिषदेत उपस्थित सर्व वैद्य मंडळी, विद्यार्थी, व सर्व श्रोत्यांचे आभार प्रदर्शन रोहन मुक्के, जिज्ञासा पूणे महानगर संयोजक यांनी केले. 

कोविड मर्यादा असल्या मुळे बरेच लोक, वैद्य, व विद्यार्थी याचा संपूर्ण लाभ घेऊ शकले नाही म्हणून या परिषदेची स्मृतिचिन्ह म्हणून एक पुस्तक छापण्यात येईल जे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना वाटण्यात येईल. याच्या मुखपृष्ठाचे अनावरण देखील या समारंभात झाले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News