त्या प्रकरणावर मनोहर भोसले म्हणतात खंडणीची तक्रार करणार


त्या प्रकरणावर मनोहर भोसले म्हणतात खंडणीची तक्रार करणार

पुणे: मू.   पो .ऊंदरगाव ता. करमाळा जिल्हा सोलापूर मी  पत्त्यावर गेली पंधरा वर्षे पासून राहावयास असून मी श्रीसदगुरु बाळुमामा यांची मनोभावे सेवा करत असतो. सेवा करत असताना

माझ्याप्रमाणेच अनेक भक्तगण मी स्थापन केलेल्या मंदिरास भेट देण्यासाठी येत असतात. त्यामुळेच सर्व भक्तांचा सत्संग तसेच अनेक धार्मिक उपक्रम हिंदू रितीरिवाजाप्रमाणे चालू असतात सदरची सेवा ही केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून व

श्री संत बाळूमामा याचे विचार व आचरण भोळ्याभाबड्या लोकांपर्यंत पोहोचविण्याचे

काम आम्ही करत असतो. सदरचे काम हे गेली दहा वर्ष पासून चालू आहेत.

दर्शनासाठी येणारे भक्तगण हे आमच्या संस्थेमध्ये बाळूमामांचे पारायण तसेच पूजा अर्चना ही सद्भावनेने करत असतात. काही निधर्मी नास्तिक लोकांना ही गोष्ट न आवडल्याने अलीकडे ते माझ्यासह भक्तांवर बेछूट खोटेनाटे आरोप करून वृत्तपत्राची दिशाभूल करून "बुवाबाजी" असे शब्द वापरून आमची जनमानसात बदनामी करत

आहेत. मी स्वतः ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केलेला असून मी त्या माध्यमातून अनेक लोकांना धार्मिक सल्ले व पारायण करण्याचा सल्ला देत असतो. मी कायद्याचा आदर सल्ला देत असतो. मी कायद्याचा आदर करणारा व्यक्ती असून आमची ही धार्मिक वृत्ती काही नास्तिक लोकांना पटली

नसल्याने त्यांनी मला व भक्तांना खंडणी देखील मागितली आहेत व मी त्यांस खडी न

दिल्यास ते माझ्यावर व भक्तांवर खोटेनाटे आरोप करून गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याने मी करमाळा पोलीस स्टेशन येथे खंडणी मागितले बाबतचा गुन्हा देखील दाखल केला आहे.अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत सद्गुरु मामा भोसले यांचे भक्त मनोहर मामा चंद्रकांत भोसले यांनी दिली .  

ते पुढे म्हणाले,मी सदनशील व शांतताप्रिय मार्गाने व मनोभावे बाळुमामांची सेवा

करताना मी बाळूमामा यांची समाधी असलेल्या आदमापुर या गावातील लोकांना

देखील माझ्याविषयी वेगळी भावना वाटल्याने व आपले बाळूमामा दुसरीकडे गेले की

काय अशी असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याने त्या सर्वांनी मी बाळूमामाचा वंशज

नाही असा ठराव पास केल्याचे मला समजले आहे. मी आदमापुर ग्रामस्थांचा आदर

करतो तसेच मी आपणास कळवू इच्छितो की, "ना मी कोणताही अवतार आहे, ना कोणता बाबा ना कोणता महाराज." मी केवळ श्री बाळूमामांचा निस्सिम भक्त म्हणून त्यांची सेवा करत आहे. केवळ माझ्याकडे आलेल्या लोकांची गर्दी पाहून काही लोकांना ते न आवडल्याने व वृत्तपत्रांमध्ये माझ्याविषयी एकतर्फी बातमी आल्याने मी व्यथित होऊन आपणासमोर खुलासा करत आहे. तसेच काही समाज कंठक मी त्यांची करोडो रुपयांची खंडणीची मागणी पूर्ण न केल्याने ते माझ्याविरुद्ध खोटे बनावट आरोप करून ते मला एक बनावट महिला उभी करून खोट्या गुन्ह्यामध्ये गुंतवण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे माझी आपणास श्री बाळूमामा याना स्मरून विनंती आहे की, माझ्यावर जे बिनबुडाचे व कपोलकल्पित आरोप झालेले आहेत. त्यासंदर्भात शहानिशा करून तसेच आमची देखील बाजू ऐकन वृत्त पत्रामध्ये प्रसारित करणे आवश्यक आहे. तसेच काही स्थानिक लोकांना पार्किंगच्या विषयावरून मनामध्ये राग द्वेष आहे. त्यामुळे मी भक्तांकडून पैसे उकळतो असे देखील माझ्यावर आरोप होत आहेत. त्यावर माझा खुलासा की, मी कोणत्याही व्यक्तीस एकही रुपयांची मागणी केली नाही. मी बाळुमामांची सेवा करतो. व तेथे आलेल्या भक्तगण हे त्यांचे स्वच्छेने शिव सिद्धि संचालित श्री मामा संस्था या संस्थेकडे देणगी देतात. सदरची देणगी ही केवळ मंदिर बांधकाम तसेच भक्त निवासासाठी वापरली जाते. याबाबत कोणासही आक्षेप असल्यास मी कोणासमोरही जाण्यास तयार आहे.असे भोसले म्हणाले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News