देऊळगाव राजे गावच्या हद्दीत पोलीस निरीक्षक श्री विनोद घुगे यांची मोठी कारवाई 60 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल केला नष्ट, अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले


देऊळगाव राजे गावच्या हद्दीत पोलीस निरीक्षक श्री विनोद घुगे यांची मोठी कारवाई 60 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल केला नष्ट, अवैध धंदे वाल्यांचे  धाबे दणाणले

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

- दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील देऊळगाव राजे नदी पात्रात आज अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू बोटी जिलेटीन च्या साह्याने उडवून पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी आपल्या कामाची चुणूक अवैध धंदे वाल्याना दाखवून दिली आहे,

 दिनांक 28.3.2021 रोजी दौंड पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक श्री विनोद घुगे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की मौजे देऊळगाव राजे  गावचे हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात अवैधरित्या यांत्रिक बोटीच्या साह्याने विनापरवाना वाळू उपसा करून वाळू चोरी करीत आहे अशी खात्रीशीर बातमी  मिळाल्यानंतर सदर ठिकाणी कारवाई करण्याकामी दौंड पोलीस स्टेशन चा स्टाफ तसेच दौंड तहसील कार्यालयातील महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने मौजे देऊळगाव राजे गावच्या हद्दीत भीमा नदीच्या पात्रात तालुका दौंड जिल्हा पुणे येथे छापा घातला असता सदर ठिकाणी 60 लाख रुपये किमतीच्या वाळूउपसा करण्याकरिता वापरल्या जाणाऱ्या यांत्रिक फायबर बोटी मिळून आल्या त्या जागीच महसूल कर्मचारी यांच्या मदतीने जिलेटिन च्या साहाय्याने स्फोट घडवून नष्ट करून टाकल्या असून सदर गुन्हा करणाऱ्या वाळू माफिया विरुद्ध  महसूल अधिकाऱ्यांनी  कायदेशिर गुन्हा नोंद केला आहे.

सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक बारामती श्री मिलिंद मोहिते उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड  राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री विनोद घुगे पोलीस हवालदार पांडुरंग थोरात, विशाल जावळे, अमीर शेख, अमोल गवळी, अमोल देवकाते तसेच सर्व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News