केडगाव अरणगाव बायपास रोड रेल्वे ब्रिज जवळ ड्रायव्हरचा खुन करणारा आरोपी अटक - नगर तालुका पोलीस ठाणे अहमदनगर यांची कारवाई


केडगाव अरणगाव बायपास रोड रेल्वे ब्रिज जवळ ड्रायव्हरचा खुन करणारा आरोपी अटक - नगर तालुका पोलीस ठाणे अहमदनगर यांची कारवाई

अहमदनगर ( प्रतिनिधी संजय सावंत ) नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील केडगाव अरणगाव बायपास रोड रेल्वे ब्रिज जवळ ड्रायव्हरचा खुन करणारा आरोपी अटक नगर तालुका पोलीस ठाणे अहमदनगर यांची कारवाई दि . २५/०८/२०२१ रोजी सकाळी ० ९ / ०० वा.चे.सुमारास केडगाव -अरणगाव बायपास रोड वरील रेल्वे ब्रीजजवळ एक अज्ञात इसमाचे प्रेत मिळून आले होते.सदर मयताचे शवविच्छेदन केले असता त्यास कोणीतरी अज्ञात इसमाने टणक हत्याराने पाठीत मारलेमुळे व फुप्फुसास सुज आलेने मरण आले असल्याचे निष्पन्न झालेने नगर तालुका पोलीस ठाणे गु.र.न .४७५ / २०२१ भादवि.क .३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक श्री.मनोज पाटील अपर पोलीस अधिक्षक श्री . सौरभ कुमार अग्रवाल उपविभागिय पोलीस अधीकारी अजित पाटील सो नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली राजेंद्र सानप सहा.पोलीस निरीक्षक नगर तालुका पोलीस ठाणे हे करीत होते . सदर मयताची ओळख पटविणेकामी सर्व जिल्ह्यामधे तसेच नजीकच्या जिल्ह्यामधे संदेश देण्यात आलेला होता , तसेच इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांच्या सहाय्याने सदर मयत व्यक्तीची ओळख पटवली गेली.सदर मयताचे नाव विकास महादेव कदम वय 40 वर्षे सध्या रा.वैष्णवी नगर केडगाव , अहमदनगर असे आहे . गोपनिय व तांत्रिक माहितीच्या आधारे सदरचा खुण करणारा आरोपी हा त्याचे ( मयत ) सोबत ड्रायव्हींगचे काम करणारा मिनीनाथ मच्छींद्र अडसरे मुळ रा.कायनेटीक चौक अहमदनगर सध्या रा.अरणगाव ता.जि.अहमदनगर हा असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने तात्काळ त्यास ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे.सदर आरोपीस मा.न्यायालयाने दिनांक 02/09/2021 रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे . सदरची कारवाई .पोलीस अधिक्षक  मनोज पाटील  व अपर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल  उपविभागिय पोलीस अधीकारी अजित पाटील  यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेद्र सानप तसेच नगर तालुका पोलीस ठाण्याचे सफौ.पठाण , पोहेकॉ रमेश गांगर्डे , रावसाहेब खेडकर , पोना भानुदास सोनवणे , धर्मराज दहिफळे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक रविकिरण सोनटक्के , पोकॉ ज्ञानेश्वर खिळे , मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राठोड , जयदत्त बांगर , चालक सहाय्यक फौजदार घोरपडे यांनी केलेली आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News