पुरस्थीती ओढावल्याने मनपा आयुक्तांना आली जाग... पाणी ओसरले अद्याप कल्याण रोडवरिल पुल वाहतुकीस बंद


पुरस्थीती ओढावल्याने मनपा आयुक्तांना आली जाग... पाणी ओसरले अद्याप कल्याण रोडवरिल पुल वाहतुकीस बंद

 अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) :अहमदनगर शहरासह जिल्ह्यात पावसाने कालपासून जोर धरला आहे. आज सकाळी देखील पावसाची रिमझिम सुरू आहे. रात्रीच्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आला आहे.नेप्तीनाका येथील नगर-कल्याण रोडवरील पूल पुरामुळे पाण्याखाली गेला आहे. तसेच अहमदनगर शहरातील अनेक रस्त्यांवरून पाणी वाहत आहे. काही वसाहतींमध्ये सखल भागांत पाणी साचले आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस सर्वत्र सुरू असल्यामुळे नागरिकांना दैनंदिन कामे करणे अवघड झाले आहे. नगर-कल्याण महामार्ग, नालेगाव रस्ता, सावेडी-बोल्हेगाव रस्ता या मार्गांवर पुराच्या पाण्यामुळे वाहतूक करणे कठीण झाले आहे.कल्याणरोड वरील पुलाची देखभाल व दुरुस्ती करावी.अशी नागरिकांनी वेळोवेळी मागणी केली होती.परंतु मनपा प्रशासनाला जाग आली नाही.हा पुल धोकादायक बनला आहे.खचण्याची शक्यता आहे.मनपाने हा पुल लवकर दुरुस्त करावा.अन्यथा हा पुल खचुन अपघात होण्याची शक्यता आहे.                               सीना नदीला पुरस्तीथी ओढावल्याने मनपा आयुक्तांना जाग आली.नालेगाव परिसरातील काही वसाहतींमध्ये घरांत पाणी शिरले. या सर्व परिस्थितीचा आढावा मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून जाणून घेतला. यावेळी मनपा आयुक्त शंकर गोरे म्हणले की,नगर शहरामध्ये पूर परिस्थिती जास्त प्रमाणात उद्भवल्यास अहमदनगर महानगरपालिकेची आपत्कालीन विभागाची पथके सज्ज आहे.तरी नागरिकांनी पूर परिस्थिती उद्भवल्यास काही अडचणी असल्यास त्वरित अहमदनगर महापालिकेत संपर्क साधावा.असे आवाहन आयुक्त गोरे यांनी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News